कोट्यवधी ग्राहकांचा मोबाइल क्रमांक होऊ शकतो बंद, 31 ऑक्टोबरपर्यंतचीच आहे मुदत

कोट्यवधी ग्राहकांचा मोबाइल क्रमांक होऊ शकतो बंद, 31 ऑक्टोबरपर्यंतचीच आहे मुदत

ट्रायनं नुकत्याच जारी केलेल्या सूचनांनुसार जर 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही मोबाइल क्रमांक अन्य नेटवर्कमध्ये पोर्ट न केल्यास तुमचा मोबाइल क्रमांक कायमस्वरुपी बंद होईल.

  • Share this:

ट्रायनं नुकत्याच जारी केलेल्या सूचनांनुसार जर 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही मोबाइल क्रमांक अन्य नेटवर्कमध्ये पोर्ट न केल्यास तुमचा मोबाइल क्रमांक कायमस्वरुपी बंद होईल. शिवाय, पुन्हा अ‍ॅक्टिव्हेटदेखील होणार नाही. त्यामुळे ट्रायच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्याचा विचार करत असाल तर ते वेळीच टाळा. कारण यात तुमचंच नुकसान होणार आहे.

...तर मोबाइल सेवा होणार बंद

वर्ष 2018च्या सुरुवातीला एअरसेल (Aircel)नं आपली सेवा बंद केली होती. फेब्रुवारी 2018 मध्ये एअरसेलनं ट्रायला युनिक पोर्टिंग कोड्स (UPC)देण्याची विनंती केली होती. जेणेकरून एअरसेलचे ग्राहक मोबाइल क्रमांक अन्य नेटवर्कमध्ये पोर्ट न करताही आपली सेवा कायम सुरू ठेवू शकतील. TRAIच्या रिपोर्टनुसार, सध्या एअरसेलचे जवळपास 70 कोटी ग्राहक आहेत. जर या ग्राहकांनी दिलेल्या मुदतीपूर्वी आपला मोबाइल क्रमांक अन्य नेटवर्कमध्ये पोर्ट न केल्यास त्यांचा मोबाइल क्रमांक बंद होणार आहे.

(वाचा : चांगल्या बजेट मध्ये स्मार्टफोन शोधत आहात? तर vivo U10 एकदा बघाच)

एअरसेलचे आहेत कोट्यवधी ग्राहक

वर्ष 2018मध्ये एअरसेलनं आपली सेवा बंद केली त्यावेळेस या कंपनीचं नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या जवळपास 9 कोटी एवढी होती. 22 फेब्रुवारी 2018मध्ये एअरसेलनं ट्रायला आपल्या ग्राहकांसाठी अ‍ॅडिशनल यूपीसी देण्याची मागणी केली. 28 फेब्रुवारी रोजी ट्रायने एअरसेलला अ‍ॅडिशनल कोड दिला देखील. टेलीकॉम टॉकच्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी 2018 ते 31 ऑगस्ट 2019दरम्यान जवळपास 19 दशलक्ष एअरसेलच्या ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक अन्य नेटवर्कमध्ये पोर्ट करण्याचा पर्याय स्वीकारला. आता ट्रायच्या नवीन आदेशानुसार एअरसेल आणि डिशनेटच्या ग्राहकांना 31 ऑक्टोबरपर्यंत आपला क्रमांक अन्य नेटवर्कमध्ये पोर्ट करावा लागणार आहे.

(वाचा : सावधान! गुगलची 'ही' सर्विस वापरताय, बॅटरीसह स्क्रीन होऊ शकते खराब)

नेमकी काय आहे प्रक्रिया ?

एअरसेलनं आपली सेवा बंद केली त्यावेळेस कंपनीनं आपल्या ग्राहकांना वेबसाइटच्या माध्यमातून यूपीसी जेनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. पण यावेळेस वेबसाइटमध्ये नेमका तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आपला मोबाइल क्रमांक पोर्ट करण्यासाठी स्वतःहून UPC जेनरेट करावा लागत आहे.

- ग्राहकांनी नेटवर्कचा पर्याय निवडल्यानंतर टेक्स्ट मेसेजमध्ये जाऊन PORT टाइप करावं.

- यानंतर आपल्या मोबाइल क्रमांक टाइप करून 1900वर पाठवावा.

- काही मिनिटांतच तुमच्या मोबाइलवर यूनीक पोर्टिंग कोड (UPC)येईल.

- तुम्हाला पाहिजे असलेल्या नेटवर्कची सेवेसाठी त्या संबंधित कंपनीच्या स्टोअरमध्ये जा आणि UPC कोडच्या मदतीनं तुमचा मोबाइल क्रमांक अन्य नेटवर्कमध्ये पोर्ट करावा. ही संपूर्ण प्रक्रिया जवळपास एका आठवड्यात पूर्ण होते.

(वाचा : फेस्टिव्हल ऑफर : 14,999 रुपयांच्या Xiaomi फोनवर 8,450 रुपयांची सूट!)

VIDEO :...म्हणून लुंगी नेसली, आदित्य ठाकरेंचा खुलासा

Published by: Manoj Khandekar
First published: October 18, 2019, 6:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading