नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : स्मार्टफोन निर्माता कंपनी Nokia ने आपला सर्वात दमदार स्मार्टफोन Nokia XR20 भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे. या फोनच्या प्री-बुकिंग तारखेचाही कंपनीकडून खुलासा करण्यात आला आहे. हा फोन 5G कनेक्टिव्हिटीसह येणारा कंपनीचा लेटेस्ट फोन आहे. हा फोन सध्या यूएस, युके, युरोपसारख्या बाजारात विक्री होत आहे.
Nokia XR20 किंमत -
Nokia XR20 च्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत USD 550 म्हणजे जवळपास 40,900 रुपये आहे. हा फोन ग्रेनाइट आणि अल्ट्रा ब्लू कलर ऑप्शनमध्ये आहे. फोन 4GB + 64GB वर्जनमध्येही उपलब्ध आहे. भारतात या फोनची किंमत अंदाजे 45,000 रुपयांपर्यंत असू शकते. भारतात Nokia XR20 चं प्री-बुकिंग 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
Nokia XR20 स्पेसिफिकेशन्स -
Nokia XR20 फोन 6GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज आणि 18W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसह असेल. फोन Android 11 OS आउट ऑफ द बॉक्सवर चालतो. कंपनीने 3 वर्षांचं OS अपग्रेड आणि 4 वर्षांपर्यंत मासिक सुरक्षा अपडेटचा दावा केला आहे. हा फोन डस्टप्रूफ आणि वॉटर-रेसिस्टेंस आहे.
- 6.67-इंची FHD+ डिस्प्ले
- 1080 × 2400 पिक्सल रेजोल्यूशन
- सेंटर-पोजीशन पंच-होल कॅमेरा आणि 550 निट्स पीक ब्राइटनेस
- Gorilla Glass Victus protection
- क्वाॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट
- गेमसाठी एड्रेनो 619 GPU
- बॅटरी 4,630mAh
कॅमेरा -
Nokia XR20 फोनला डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ZEISS ऑप्टिक्ससह 48MP प्रायमरी सेंसर आणि f/1.8 अपर्चर आणि 13MP वाइड-अँगल लेन्स आहे. फोनला सेल्फीसाठी 8MP कॅमेरा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone