नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर: देशातल्या मोबाइल क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनी आता पुन्हा एकदा नवा धमाका उडवून देणार आहे. Jiophone Next हा अँड्रॉइड स्मार्टफोन (Android Smartphone) लवकरच रिलायन्सकडून बाजारात आणला जाणार असून, तो जगातला सर्वांत स्वस्त 4G स्मार्टफोन असेल, असा दावा कंपनीने केला आहे. हा स्मार्टफोन 10 सप्टेंबरपूर्वीच बाजारात दाखल होण्याचं नियोजन होतं; मात्र काही अडचणींमुळे फोनचं लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं. हा फोन आता दिवाळीपूर्वी बाजारात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही मर्यादित युझर्सच्या माध्यमातून जिओफोन नेक्स्ट या फोनच्या चाचण्या घेतल्या जात होत्या, जेणेकरून फोनचं लाँचिंग दिवाळीपूर्वी मोठ्या पातळीवर करता येईल, असं रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. कोरोनाच्या कालखंडात परदेशातून येणारे सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक चिप्स आदींचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. जिओफोन नेक्स्टच्या लाँचिंगला होत असलेल्या उशिरामागे हेही एक कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सेमीकंडक्टरचा तुटवडा काही काळात संपेल, असं कंपनीने गेल्या महिन्यात सांगितलं होतं.
हेही वाचा- iPhone फुल Charge करण्यासाठी इतकं येतं विजेचं बिल, ऐकून व्हाल हैराण
कंपनीतर्फे या फोनच्या फीचर्सबद्दलही कोणतीही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही; मात्र या फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉइड रिलीज आणि सिक्युरिटी अपडेट्स असतील, असं कंपनीने स्पष्ट केलं होतं. या फोनमध्ये गुगल प्ले प्रीलोडेड असेल आणि ‘Read Aloud’ आणि ‘Translate Now’ ही फीचर्सही असतील.
हेही वाचा- App चं नाव 'अच्छी बाते' आणि हेतू मात्र दहशतवादी, Google Play Store वर Jaish चं App
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance Jio