Home /News /technology /

तुमचा फोन Water Resistant आहे की Water Proof, जाणून घ्या काय आहे दोघांमधला फरक

तुमचा फोन Water Resistant आहे की Water Proof, जाणून घ्या काय आहे दोघांमधला फरक

हजारो स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. यात वॉटर रेसिस्टेंट, वॉटरप्रुफ किंवा डस्ट रेसिस्टेंट, वॉटर रिपेलेंट असेही स्मार्टफोन येतात. पण वॉटरप्रुफ स्मार्टफोन आणि वॉटर रेसिस्टेंट यात नेमका फरक काय?

  नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : सध्या स्मार्टफोन लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आयुष्यात महत्त्वाचा झाला आहे. विविध प्रकारचे विविध फीचर्स असलेले हजारो स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. यात वॉटर रेसिस्टेंट, वॉटरप्रुफ किंवा डस्ट रेसिस्टेंट, वॉटर रिपेलेंट असेही स्मार्टफोन येतात. पण वॉटरप्रुफ स्मार्टफोन आणि वॉटर रेसिस्टेंट यात नेमका फरक काय? वेगवेगळ्या फोनमध्ये कंपनीकडून वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. मागील वर्षी iPhone 12 मध्ये वॉटर रेसिस्टेंट असल्याचा दावा चुकीचा ठरल्याने इटलीमध्ये Apple कंपनीवर कोट्यवधी रुपयांचा दंड लावण्यात आला होता. वॉटर रेसिस्टेंट (Water Resistant) म्हणजे काय? सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वॉटर रेसिस्टेंट म्हणजे वॉटरप्रुफ नाही. वॉटर रेसिस्टेंट म्हणजे तुमच्या फोनमध्ये पाणी आत जाणं किंवा पाणी आत घुसणं कठीण आहे. काही थेंब फोनवर पडले तरी, फोनच्या आत पाणी न गेल्याने नुकसान होऊ शकत नाही. परंतु फोन पाण्यात पडला, डुबला तर त्याला नुकसान होणार नाही, असं होत नाही. फोन संपूर्ण पाण्यात पडला तर तो केवळ Water Resistant असल्याने त्याला नुकसान होऊ शकतं.

  Flipkart ने iPhone 12 ऐवजी पाठवला साबण, VIDEO पाहून व्हाल हैराण

  वॉटर रिपेलेंट (Water Repellent) म्हणजे काय? जर तुमचा फोन वॉटर रिपेलेंटयुक्त आहे, तर याचा अर्थ तुमच्या स्मार्टफोनवर एक पातळशी लेयर लावण्यात आली आहे, जी फोनच्या आत पाणी जाऊ देणार नाही. फोनमध्ये ही लेयर आत आणि बाहेर दोन्ही बाजूला लावलेली असते. यासाठी अधिकतर कंपन्या हायड्रोफोबिक पृष्ठभाग तयार करतात आणि ते लावतात. वॉटरप्रुफ (Water Proof) - तुमचा फोन वॉटरप्रुफ असल्याचा दावा कंपनीने केला असल्यास, याचा अर्थ फोन पाण्यातही सुरक्षित राहील. अशा फोनचा वापर पाण्यातही करता येतो. तसंच पाण्यात फोटोग्राफीही करता येते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Smartphone, Tech news

  पुढील बातम्या