Home /News /technology /

64MP कॅमेरासह Realme चा जबरदस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

64MP कॅमेरासह Realme चा जबरदस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

Realme GT Neo 2 भारतात लाँच झाला आहे. या फोनचा पहिला सेल Flipkart वर 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

  नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : Realme GT Neo 2 भारतात लाँच झाला आहे. या फोनचा पहिला सेल Flipkart वर 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर Flipkart प्लस मेंबर्स 16 ऑक्टोबरपासून या फोनची ऑनलाइन खरेदी करू शकतील. काय आहेत स्पेसिफिकेशन्स - - Qualcomm Snapdragon 870SoC - पंच होल-डिस्प्ले - 8GB ते 12GB पर्यंत अपग्रेड करता येणार - 6.62 इंची E4 डिस्प्ले, फुल HD+ रेजोलूशन - 120Hz रिफ्रेश रेट - HDR 10+ सपोर्ट - 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह, 7GB डायनेमिक RAM एक्सटेंशन - Android 11 बेस्ड Realme UI 2.0, GT Mode 2.0 - 5000mAh बॅटरी - 65W सुपर डार्ट चार्ज कनेक्टिविटीसाठी फोनला 5G, 4G LTE, Wifi, ब्लूटूथ ECf USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. रियलमी GT Neo 2 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि गेमिंगसाठी कुलिंग सिस्टमही देण्यात आलं आहे. या फोनची बॅटरी 0 ते 100 टक्के केवळ 36 मिनिटांत चार्ज होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

  तुमचा फोन Water Resistant आहे की Water Proof, जाणून घ्या काय आहे दोघांमधला फरक

  कॅमेरा - Realme GT Neo 2 फोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड शूटर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो शूटर देण्यात आला आहे.

  50MP कॅमेरासह आज लाँच होणार OnePlus 9RT, खास डिस्प्लेसह मिळतील जबरदस्त फीचर्स

  काय आहे Realme GT Neo 2 ची किंमत - Realme GT Neo 2 ची भारतात सुरुवातीची किंमत 31,999 रुपये आहे. 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी ही किंमत आहे. तर 12GB + 256GB वेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Realme, Smartphone

  पुढील बातम्या