नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : केंद्र सरकारकडून गुरुवारी सोशल मीडियाच्या (social media) जवळपास सर्वच प्लॅटफॉर्म्ससाठी नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. नव्या गाईडलाईन्सअंतर्गत, फेसबुक (facebook), ट्वीटर (twitter), व्हॉट्सअॅपसारखे (whatsapp) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टारसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म्स असणार आहेत. सरकारकडून यासंबंधी मार्गदर्शक तत्वं तयार करण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली आहे. नव्या गाईडलाईन्सनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला कोणत्याही आक्षेपार्ह कंटेंटची समस्या असल्यास, त्याला 36 तासांच्या आत ती पोस्ट हटवावी लागेल. तसंच डिजिटल मीडियाला इलेक्ट्रॉनिक मीडियाप्रमाणे सेल्फ रेग्युलेशन करावं लागेल. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं की, भारतात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या 140 कोटी आहे. हे नवे नियम युजर्सच्या संख्येच्या आधारे अधिक कडक होणार आहेत. तसंच या प्लॅटफॉर्म्सना भारतीय कायद्यांचं पालन करावं लागणार आहे. भारतात या प्लॅटफॉर्म्सवर आहेत इतके युजर्स - WhatsApp - 53 कोटी YouTube - 44 कोटी Facebook - 41 कोटी Instagram - 21 कोटी Twitter - 1.75 कोटी
(वाचा - सावधान! Google वर या 8 गोष्टी सर्च करताय? वाढू शकतात तुमच्या अडचणी )
तीन महिन्यांत लागू होणार नवे नियम - सोशल मीडियासाठीच्या नव्या गाईडलाईन्स 3 महिन्यात लागू करण्यात येणार आहेत. रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं की, सोशल मीडिया कंटेंटबाबत जर एखादी तक्रार मिळाली, तर ती नोंदवून त्यावर लगेच कारवाई करावी लागेल. त्याचं पालन न केल्यास आयटी अॅक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल.
(वाचा - पर्यायी इंधन म्हणून हायड्रोजन कितपत योग्य? घ्या जाणून याचे फायदे-तोटे! )
24 तासांत दाखल होणार तक्रार - कंटेंटसाठी सोशल मीडिया तक्रार अधिकारी नियुक्त करावा लागेल. त्यांना 24 तासांत तक्रार दाखल करून 15 दिवसांच्या आत समस्येचं निराकरण करावं लागेल. प्लॅटफॉर्म्सना भारतात आपल्या नोडल ऑफिसर, रेसिडेंट ग्रीवांस ऑफिसर तैनात करावं लागेल. त्याशिवाय दर महिन्याला किती तक्रारींवर अॅक्शन घेण्यात आली, याची माहिती द्यावी लागेल.