गूगलवर आपल्याला जगभरातील सगळी माहिती केवळ एक क्लिकवर उपलब्ध होते. लोकांचा याच्यावरचा विश्वास इतका वाढला आहे, की अगदी छोट्या गोष्टींपासून अतिशय गंभीर किंवा खासगी गोष्टीही लोक याचा वापर करतात. सर्च करणारे लोक असं गृहीत धरत असतात, की आपल्याला मिळणारी सगळी माहिती खरीच आहे. मात्र, अनेकदा गुगलवर काही सर्च करताना लोक अशी चूक करतात जी चांगलीच महागात पडते. यामुळे खासगी माहिती हॅक होण्यापासून चुकीची माहिती मिळण्यासारखे अनेक तोटे असतात.
सध्याच्या काळात जवळपास सगळेच लोक ऑनलाईन बँकिंगचा वापर करतात. हे सोपंही आहे आणि यामुळे वेळही वाचतो. मात्र, हे तितकंच धोकेदायकही आहे. ऑनलाईन बँकिंग करणाऱ्यांना फसवण्यासाठी गुन्हेगार मिळते जुळते URL बनवतात आणि कोणी आपला आयडी पासवर्ड टाकताच त्यांच्या अकाऊंटमधील पैसे काढून गायब होतात. यापासून वाचण्यासाठी आपल्या बँक आयडीची URL नेहमी तपासून पाहा