Motorola चे 4 नवे स्मार्टफोन्स लाँच; जाणून घ्या फोनच्या किंमती आणि फीचर्स

Motorola चे 4 नवे स्मार्टफोन्स लाँच; जाणून घ्या फोनच्या किंमती आणि फीचर्स

Moto G Stylus (2021), Moto G Power (2021), Moto G Play (2021) आणि Motorola One 5G Ace लाँच झाले आहेत. हे चारही फोन अँड्रॉईड 10 वर काम करतात. हे चारही फोन वेगवेगळे रॅम स्टोरेज, कलर, किंमत आणि फीचर्ससह लाँच झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जानेवारी : मोटोरोलाने आपले चार नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Moto G Stylus (2021), Moto G Power (2021), Moto G Play (2021) आणि Motorola One 5G Ace लाँच झाले आहेत. हे चारही फोन अँड्रॉईड 10 वर काम करतात. हे चारही फोन वेगवेगळे रॅम स्टोरेज, कलर, किंमत आणि फीचर्ससह लाँच झाले आहेत.

Moto G Stylus (2021) फीचर्स -

मोटो G स्टायलस (2021) ला 6.8 इंची फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगन 678 प्रोसेसर, 4 जीबी रॅम 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज, 4000mAh बॅटरी, 10W चार्जिंग सपॉर्ट देण्यात आला आहे. फोनला रियर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. फोनला सेल्फीसाठी अपर्चर एफ/2.2 सह 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

(वाचा - मोबाईल फोन सतत डिस्चार्ड होतोय? लवकर चार्ज करण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स)

Moto G Power (2021) -

6.6 इंची HD डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज, 5000mAh बॅटरी, 15W फास्ट चार्जिंग सपॉर्ट, फोनला 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी अपर्चर एफ/2.0 सह 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G Play (2021) -

6.5 इंची HD डिस्प्ले

स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर

3 जीबी 32 जीबी स्टोरेज

13 मेगापिक्सल प्राइमरी 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर डुअल रियर कॅमेरा सेटअप

अपर्चर एफ/2.2 सह, 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

10W फास्ट चार्जिंग सपॉर्टसह, 5000mAh बॅटरी

(वाचा - Whatsapp ला नवा पर्याय; भारतात गुगल प्ले स्टोरवर नंबर 1 फ्री App ठरलं Signal)

Motorola One 5G Ace -

6.7 इंची फुल एचडी डिस्प्ले

स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर

6 जीबी रॅम 128 जीबी इंटरनल स्टोरेज

48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल, 2 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर

16 मेगापिक्सल फ्रंट सेंसर

15W चार्जिंग सपॉर्टसह, 5000mAh बॅटरी

(वाचा - 10000 रुपयांपर्यंत स्वस्त झाला भारतातील पहिला 5G स्मार्टफोन;जाणून घ्या नवी किंमत)

मोटोरोलाने हे सर्व फोन यूएसमध्ये लाँच केले आहेत. इतर मार्केटमध्ये फोनच्या लाँचिंगबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Moto G Stylus (2021) च्या 4 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 299 डॉलर, जवळपास 22,000 रुपये आहे. Moto G Power (2021) च्या 3 जीबी रॅम 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 199.99 डॉलर म्हणजेच 14,700 रुपये आहे आणि 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 249 डॉलर जवळपास 18,300 रुपये आहे.

Moto G Play (2021) ची किंमत 169.99 डॉलर (12,500 रुपये) आहे. तर, Motorola One 5G Ace च्या 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 399.99 डॉलर (जवळपास 29,500 रुपये) आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: January 10, 2021, 6:14 PM IST
Tags: smartphone

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading