जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / मोबाईल फोन सतत डिस्चार्ड होतोय? लवकर चार्ज करण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

मोबाईल फोन सतत डिस्चार्ड होतोय? लवकर चार्ज करण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

मोबाईल फोन सतत डिस्चार्ड होतोय? लवकर चार्ज करण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

फोन चार्जिंगला लावल्यानंतर कधी लवकर चार्ज होतो, तर कधी अतिशय वेळ लागतो. असं होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. परंतु काही अतिशय सोप्या आणि सहज ट्रिक्सने फोन लवकर चार्ज होण्यासाठी मदत मिळू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जानेवारी : स्मार्टफोनमध्ये सर्वसाधारणपणे अनेक युजर्सला येणारी समस्या म्हणजे बॅटरी ड्रेन होणं. फोन सतत डिस्चार्ड (Phone discharge) होत असल्याने तो सतत चार्जिंगला लावावा लागतो. फोन चार्जिंगला लावल्यानंतर कधी लवकर चार्ज होतो, तर कधी अतिशय वेळ लागतो. असं होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. परंतु काही अतिशय सोप्या आणि सहज ट्रिक्सने फोन लवकर चार्ज होण्यासाठी मदत मिळू शकते. Flight Mode - फोन लवकर चार्ज होण्यासाठी हा सर्वात सोपा, सहज उपाय आहे. फोन Flight Mode वर टाकल्यानंतर फोनचे सर्व फंक्शन्स बंद होतात. त्यामुळे बॅटरी लवकर चार्ज होण्यास मदत होते. USB - अनेकदा लॅपटॉप किंवा कंप्यूटरवर काम करताना, फोन यूएसबी केबलने चार्ज केला जातो. परंतु मोबाईल फोन USB पेक्षा चार्जरने लवकर चार्ज होतो. त्यामुळे शक्यतो फोन यूएसबीने चार्ज करू नये.

(वाचा -  भारतीय विद्यार्थ्याने जिंकलं NASA चं मून टू मार्स अ‍ॅप चॅलेंज; बनवलं हे खास App )

Original चार्जर - फोनच्या बॅटरी आणि चार्जिंगसाठी आपल्या फोनचा चार्जरच उत्तम असतो. त्यामुळे फोन चार्ज करताना फोनच्या Original चार्जरचा वापर करा. यामुळे फोन लवकर आणि सुरक्षित चार्ज होतो.

(वाचा -  चुकूनही Google वर Search करू नका ‘या’ 10 गोष्टी; होऊ शकतं नुकसान )

Switch Off - फोन लवकर चार्ज होण्यासाठी, तो स्विच ऑफ करुन चार्ज करणं सर्वात चांगला पर्याय आहे. फोन ऑफ केल्यामुळे फोनची स्क्रिन, मोशन सेन्सर आणि कोणत्याही app चा वापर होणार नाही. त्यामुळे फोन लवकर चार्ज होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात