मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Whatsapp ला नवा पर्याय; भारतात गुगल प्ले स्टोरवर नंबर 1 फ्री App ठरलं Signal

Whatsapp ला नवा पर्याय; भारतात गुगल प्ले स्टोरवर नंबर 1 फ्री App ठरलं Signal

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे अनेक युजर्स नाखुश आहेत. त्यामुळे युजर्स आता व्हॉट्सअ‍ॅपला दुसरे पर्याय शोधू लागले आहेत. युजर्स प्रायव्हसी फोकस्ड इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप सिग्नल (Signal) वर स्विच होत आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 10 जानेवारी : जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही पॉलिसी 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे अनेक युजर्स नाखुश आहेत. त्यामुळे युजर्स आता व्हॉट्सअ‍ॅपला दुसरे पर्याय शोधू लागले आहेत. युजर्स प्रायव्हसी फोकस्ड इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप सिग्नल (Signal) वर स्विच होत आहेत. आता हे अ‍ॅप भारतासह अनेक देशांमध्ये टॉप फ्री अ‍ॅप बनलं आहे.

एलॉन मस्कने केले ट्विट -

टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ट्विट करुन आपल्या फॉलोअर्सला सिग्नल अ‍ॅप वापरण्याचा सल्ला दिला आहे. मस्क यांच्या या ट्विटची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे. 2.7 लाख लोकांनी त्यांचं हे ट्विट लाईक केलं असून 32 हजारहून अधिकांनी रिट्विट केलं आहे.

2014 मध्ये लाँच झालं होतं सिग्नल अ‍ॅप -

व्हॉट्सअ‍ॅपचे को-फाउंडर ब्रायन एक्टन यांनी सिग्नल फाउंडेशन तयार केलं. 2014 मध्ये हे लाँच करण्यात आलं. सध्या सिग्नल अ‍ॅपचे सीईओ मॉक्सी मार्लिनस्पाइक (Moxie Marlinspike) आहेत. ‘Say Hello to Privacy’ अशी या अ‍ॅपची टॅगलाईन आहे.

Signal आणि WhatsApp मध्ये काय फरक आहे -

सिग्नल अ‍ॅप युजरचा कोणताही डेटा कलेक्ट करत नाही. तर व्हॉट्सअ‍ॅपने आता युजर्सचा डेटा कलेक्ट करण्यास सुरुवात केली आहे. सिग्नल अ‍ॅप युजर्सचा केवळ मोबाईल नंबर घेतं. तर व्हॉट्सअ‍ॅप फोन नंबर, कॉन्टॅक्ट लिस्ट, लोकेशन, मेसेज हा संपूर्ण डेटा कलेक्ट करतं.

व्हॉट्सअ‍ॅपने नवी पॉलिसी आणली असून ती युजर्सला 8 फेब्रुवारीपर्यंत अ‍ॅक्सेप्ट करावी लागणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सध्या agree आणि not now असा पर्याय निवडता येईल. व्हॉट्सअ‍ॅपची सर्व्हिस ऑपरेट करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा कंटेन्ट फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल. युजर्सला नव्या पॉलिसीचा पॉप-अप येईल, त्याला अ‍ॅक्सेप्ट करावं लागेल, agree वर क्लिक केल्यानंतर कंपनीच्या नव्या पॉलिसीला तुमची सहमती असेल. परंतु अ‍ॅक्सेप्ट न केल्यास अकाउंट डिलीट होणार असल्याचं बोललं जात आहे.

First published:

Tags: Whatsapp, WhatsApp user