नवी दिल्ली, 9 जानेवारी : देशात सर्वात पहिले 5G स्मार्टफोन लाँच करणारी कंपनी REALME ने आपल्या X50 Pro 5G स्मार्टफोनच्या किंमतीत 10 हजार रुपयांपर्यंतच्या कपातीची घोषणा केली आहे. हा फोन युजर्समध्ये अतिशय लोकप्रिय आहे. रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत घोषणा केली आहे. नव्या किंमतीसह हा फोन आता कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
8GB + 128GB स्टोरेज मॉडेल आता 31,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. यापूर्वी या फोनची किंमत 41,999 रुपये होती. तर 12GB + 256GB स्टोरेज मॉडेल 47,999 रुपयांऐवजी 37,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतं. हा स्मार्टफोन मोस ग्रीन आणि रस्ट रेड कलरमध्ये उपलब्ध आहे.
X50 Pro 5G स्पेसिफिकेशन्स -
या फोनच्या सर्व वेरिएंटमध्ये Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉईड 10 ओएसवर काम करतो. यात पॉवर बॅकअपसाठी 65 सुपरडाट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनला 6.44 इंची ड्यूल पंच होल डिस्प्ले आहे.
India’s first 5G smartphone #realmeX50Pro is now available at a special price.
Head to https://t.co/EgEe8viGtE, Mainline Stores & Flipkart. pic.twitter.com/fVG2sxxaqj — Madhav Sheth (@MadhavSheth1) January 6, 2021
फोनला क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. तर 12 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड लेन्स आणि एक B & W लेन्स देण्यात आली आहे. realme x50 pro ला ड्यूअल फ्रंट कॅमेरा आहे, ज्यात 32 मेगापिक्सल प्रायमरी लेन्स आणि 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.