• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • मोबाईलची बॅटरी सतत डिस्चार्ज होते? हे अ‍ॅप्स डाउनलोड करुन वाढवता येईल Battery Life

मोबाईलची बॅटरी सतत डिस्चार्ज होते? हे अ‍ॅप्स डाउनलोड करुन वाढवता येईल Battery Life

सतत मोबाईलची बॅटरी कमी होणं, बॅटरी डिस्चार्ज होणं यामागे अनेक कारणं असू शकतात. परंतु काही असे Apps आहेत, ज्याद्वारे मोबाईलची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी मदत होऊ शकते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 मार्च : जर मोबाईल सतत चार्ज करावा लागत असेल, तर सर्वात आधी बॅटरी खराब झाली असेल की काय? असा पहिला अंदाज वर्तवला जातो. पण बॅटरी लो होण्यामागे हे एकच कारण नसतं. सतत मोबाईलची बॅटरी कमी होणं, बॅटरी डिस्चार्ज होणं यामागे अनेक कारणं असू शकतात. परंतु काही असे Apps आहेत, ज्याद्वारे मोबाईलची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल जुना झाल्यानेही बॅटरी लवकर डिस्चार्ज होत असल्याची समस्या येऊ शकते. पण हे यामागचं एकच कारण नाही. मोबाईलमध्ये बॅकग्राउंडमध्ये चालणारे Apps, GPS आणि ब्राईटनेसमुळेही बॅटरी लवकर खराब होऊ शकते. Greenify - गुगल प्लेमधून Greenify हे App डाउनलोड करता येऊ शकतं. या अ‍ॅपची खास बाब म्हणजे, हे अ‍ॅप मोबाईलची स्क्रिन बंद होताच, मोबाईलमध्ये बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले सर्व Apps त्वरित बंद करतं.

  (वाचा - हायवेवर आपात्कालीन परिस्थितीसह नेटवर्कचीही समस्या आहे? जाणून घ्या सोपा उपाय)

  Servicely - मोबाईलमध्ये Servicely अ‍ॅप डाउनलोड करता येऊ शकतं. बॅटरी लाईफ सुधारण्यासाठी या अ‍ॅपची मदत होऊ शकते.

  (वाचा - या ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्यास होणार 1 वर्ष जेल,भरावा लागेल 10000 रुपये दंड)

  Naptime - मोबाईलच्या बॅटरीचा योग्य वापर करण्यासाठी युजर्स Naptime या अ‍ॅपची मदत घेऊ शकतात. मोबाईल स्क्रिन बंद झाल्याच्या काही मिनिटांनंतर हे अ‍ॅप काम करण्यास सुरू करतं.

  (वाचा - जाणून घ्या किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?असं करा डिलिंक)

  Battery Guru - मोबाईल बॅटरी दुरुस्त ठेवण्यासाठी Battery Guru डाउनलोड करता येऊ शकतं. या अ‍ॅपचा वापर बॅटरी चार्जिंग अलर्ट आणि इतर माहितीसाठी केला जाऊ शकतो. या App ला प्ले स्टोरमध्ये चांगली पसंती असल्याचीही माहिती आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: