• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • कोरोना उपचारांबाबत एप्रिल, मेमध्ये Facebook, Twitter ने पोहोचवली दिशाभूल करणारी माहिती

कोरोना उपचारांबाबत एप्रिल, मेमध्ये Facebook, Twitter ने पोहोचवली दिशाभूल करणारी माहिती

ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नालिझमच्या अहवालानुसार, ही माहिती प्रामुख्याने हिंदी भाषेत (Hindi Language) होती, त्यामुळे तिच्या फॅक्ट चेकिंगसाठी (Fact Checking) या कंपन्यांकडे कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती.

  • Share this:
नवी दिल्ली, 12 जून : एप्रिल ते मे महिन्यादरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची (Corona) दुसरी लाट आली. या लाटेच्या तीव्रतेमुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. परिणामी ताण वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली. देशात या कालावधीत कोरोनामुळे एकीकडे अशी स्थिती असताना, दुसरीकडे फेसबुक (Facebook), ट्विटरसारख्या (Twitter) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन कोरोना आणि कोरोनावरील उपचारांबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात होती. ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नालिझमच्या अहवालानुसार, ही माहिती प्रामुख्याने हिंदी भाषेत (Hindi Language) होती, त्यामुळे तिच्या फॅक्ट चेकिंगसाठी (Fact Checking) या कंपन्यांकडे कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. एप्रिल ते मे या कालावधीत फेसबुकवर 150 दिशाभूल करणारी माहिती असलेल्या पोस्ट टाकण्यात आल्या. या पोस्ट 10 कोटी लोकांपर्यंत पोहोचल्या आणि त्यापैकी 10 पोस्ट या फेक आहेत असं स्पष्ट केलं किंवा त्या डिलीट केल्या. याच कालावधीत ट्विटरवर 65 पोस्ट या चुकीची माहिती देण्याऱ्या होत्या. त्या 35 लाख लोकांपर्यंत पोहोचल्या आणि विशेष म्हणजेच यापैकी एकही पोस्ट डिलीट करण्यात आली नाही. नफेखोरीमुळे सोशल मीडियावरुन हटवल्या जात नाहीत पोस्ट - दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, फॅक्ट चेक साईट ऑल्ट न्यूजचे प्रतिक सिन्हा यांनी सांगितलं, की फेसबुक तसंच अन्य कंपन्यांना दिशाभूल करणाऱ्या माहितीची पडताळणी करण्यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज आहे. परंतु, नफेखोरीमुळे असं केलं जात नाही. भारत आणि अमेरिकेतील जाहिरातींच्या दरात मोठा फरक आहे. इथे फारसा पैसा मिळत नसल्याने कंपनी मनुष्यबळात गुंतवणूक करण्याचं टाळते आणि त्यामुळे पोस्ट फिल्टर होत नाहीत.

(वाचा - Facebook आणि Instagram वरून करा बक्कळ कमाई, पाहा नवीन फिचर)

या पोस्ट दिशाभूल करणाऱ्या असूनही कारवाई नाही - ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नालिझमच्या अहवालानुसार, बाबा रामदेव (Baba Ramdev) कोरोनिल किटच्या माध्यमातून कोरोनावर उपचार शक्य असल्याचा दावा करत आहेत. योग्य प्रकारे श्वास घेत नसलेल्या लोकांबाबतचा हा सोशल मीडियावरील व्हिडीओ कोट्यवधी लोकांनी पाहिला. परंतु, त्यांच्या कोणत्याही पोस्ट संदर्भात सोशल मीडियावर कोणतीही कारवाई झाली नाही. ऑक्सफर्डच्या रिसर्च फेलो सुमित्रा बद्रीनाथ यांच्या म्हणण्यानुसार, फेसबुकवर बाबा रामदेव यांची उपस्थिती हा करोडो डॉलर्सचा प्रश्न आहे. त्यामुळे फेसबुक त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या पोस्ट हटवत नाही. खरंतर बाबा रामदेव यांचे दावे दुसऱ्या लोकांसाठी प्रेरणा बनत आहेत. युट्युबवर (Youtube) तर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ आहेत.

(वाचा - एखाद्याच्या निधनानंतर त्याच्या Facebook Account चं काय होतं?)

युट्युबवर अनेक `बाबा` आपापल्या पध्दतीने सांगतात कोरोनावरील उपचार - यूट्यूबर असे अनेक `बाबा` आहेत, की जे आपपल्या पध्दतीने कोरोनावरील इलाज सांगत आहेत. यात एक स्वामी इंद्रदेव महाराज देखील आहेत. या महाराजांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी दावा केला होता, की वाफ घेतल्याने कोरोना होत नाही. पूर्ण कुटुंबाने वाफ घेतली, तर कोणालाही मास्क (Mask) किंवा सॅनिटायझर (Sanitizer) वापरला नाही तरी कोरोना होणार नाही, असा दावा त्यांनी केला होता. कारण ही वाफ तुमचं शरीर आतून सॅनिटाईज करते आणि यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. मात्र मागील वर्षी डब्ल्यूएचओने (WHO) इशारा दिला होता, की कोरोनावर कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला वश्य घ्या. अनेक अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे, की डॉक्टरांच्या सल्ल्याविना नियमित वाफ घेणं हे अनेकदा जीवावर बेतू शकतं. फेसबुककडे हिंदी भाषेतील फॅक्ट चेकर उपलब्ध नाही - या अहवालानुसार, एप्रिल ते मे दरम्यान 150 अशा पोस्ट दिसून आल्या, की ज्यात कोरोनावरील उपचारांच्या देशी पध्दती सांगण्यात आल्या होत्या. सर्वात मोठी गोष्ट अशी की या पोस्टचा रिच (Reach) म्हणजे पोस्ट पाहणाऱ्यांची संख्या 10 कोटींहून अधिक होती. त्यापैकी कोट्यवधी लोक अशा पोस्ट शेअर आणि लाईक करत होते. अनेक लोकांनी या पोस्टवर कमेंटसही केल्या. डॉक्टर्स आणि डब्ल्यूएचओ अशा प्रकारचे इलाज टाळण्याचा सल्ला देत असतानाही फेसबुक जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अशा दिशाभूल करणाऱ्या 7 टक्के पोस्टही डिलीट करू शकला नाही किंवा या पोस्ट दिशाभूल करणाऱ्या आहेत असं लेबल देखील लावू शकला नाही. अशा 150 दिशाभूल करणाऱ्या पोस्टपैकी मुश्किलीने 10 पोस्ट हटवल्या गेल्या किंवा त्यांच्यावर खोटी माहिती असे लेबल लावण्यात आले.

(वाचा - Alert! पब्लिक WiFi चा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवाच)

ट्विटरने तर अशा पोस्ट हटवण्याची तसदही घेतली नाही - ट्विटर इंडिया राजकीय पोस्टवर कारवाई करण्याबाबत अनेकदा चर्चेत असतं. परंतु गेल्या दोन महिन्यात कोरोना उपचारांबाबत पसरवण्यात आलेल्या दिशाभूल पोस्ट विषयी ट्विटर बेफिकीर असल्याचं दिसून आलं. एप्रिल ते मे या दोन महिन्यात ट्विटरवर सुमारे 65 दिशाभूल करणाऱ्या पोस्ट करण्यात आल्या. त्या 35 लाख लोकांपर्यंत पोहोचल्या परंतु, यापैकी एकही पोस्ट हटवण्याची तसदी ट्विटरची घेतली नाही. एप्रिलमध्ये ट्विटरने सांगितलं होतं, की सरकारने अनेक ट्विट्स बाबत नाराजी व्यक्त केली होती. सरकारने मीडिया नामा, कॉंग्रेसचे खासदार रेवंत रेड्डी, बंगालचे मंत्री मलय घाटक, अभिनेता विनीत कुमार सिंह आणि दोन चित्रपट निर्मात्यांचे ट्विट फेक असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्या हटवण्यात आल्या, परंतु त्यांचं अकाउंट ब्लॉक केले गेले नाहीत. त्यानंतर अनेक अकाउंटवरुन पोस्ट शेअर केल्या गेल्या. परंतु, त्याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.
Published by:Karishma Bhurke
First published: