मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! पब्लिक WiFi चा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवाच, फ्री इंटरनेटमुळे पर्सनल डेटा धोक्यात

Alert! पब्लिक WiFi चा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवाच, फ्री इंटरनेटमुळे पर्सनल डेटा धोक्यात

पब्लिक वायफायचा वापर करताना हॅकर्स फोनचा डेटा चोरी करण्याची शक्यता निर्माण होते. परंतु काही गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही पब्लिक वायफायचा वापर करताना तुमचा डेटा सुरक्षित ठेऊ शकता.

पब्लिक वायफायचा वापर करताना हॅकर्स फोनचा डेटा चोरी करण्याची शक्यता निर्माण होते. परंतु काही गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही पब्लिक वायफायचा वापर करताना तुमचा डेटा सुरक्षित ठेऊ शकता.

पब्लिक वायफायचा वापर करताना हॅकर्स फोनचा डेटा चोरी करण्याची शक्यता निर्माण होते. परंतु काही गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही पब्लिक वायफायचा वापर करताना तुमचा डेटा सुरक्षित ठेऊ शकता.

नवी दिल्ली, 9 जून: आजकाल पब्लिक वायफायचा (Public WiFi) वापर करणं सामान्य बाब आहे. हॉटेल, शॉपिंग मॉल, रेल्वे स्टेशन, लायब्ररी, एअरपोर्ट, बस आणि इतरही अनेक ठिकाणी पब्लिक वायफायची सुविधा अगदी सहजपणे मिळते. युजर्स फ्री वायफायचा (Free WiFi) मोठ्या प्रमाणात वापरही करतात. पण याचा वापर करणं धोकादायकही ठरू शकतं. पब्लिक वायफायचा वापर करताना हॅकर्स फोनचा डेटा चोरी करण्याची शक्यता निर्माण होते. तसंच याचा चुकीच्या पद्धतीनेही वापर केला जाऊ शकतो. परंतु काही गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही पब्लिक वायफायचा वापर करताना तुमचा डेटा सुरक्षित ठेऊ शकता.

VPN -

व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्कचा (VPN) वापर करुन तुम्ही आपला डेटा पब्लिक वायफायमध्येही सुरक्षित ठेऊ शकता. VPN तुमच्या डेटा ट्रॅफिकला एंक्रिप्ट करतो आणि सर्व्हर आणि ब्राउजरदरम्यान प्रोटेक्टेड टनल उभा करतो. ज्यामुळे सायबर क्राईम करणारे हॅकर्स पर्सनल डेटापर्यंत पोहचू शकत नाहीत.

(वाचा - तुमच्या फायद्याची बातमी, Online Transaction करताना या गोष्टींकडे लक्ष द्या)

AntiVirus -

अँटीव्हायरस तुमच्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये एक आवश्यक टूलप्रमाणे काम करतो. अँटीव्हायरसचा वापर तुमच्या डिव्हाईसला सेफ आणि सिक्योर करतो. जर तुमच्या डिव्हाईसमध्ये अँटीव्हायरस असेल, तर हॅकर्स तुमच्या फोनमध्ये काही करत असल्यास, याची माहिती तुम्हाला मिळू शकते. तसंच अँटीव्हायरस तुमच्या डिव्हाईसमध्ये कोणत्याही प्रकारचा व्हायरस येण्यापासून वाचवतो.

(वाचा - WhatsAppमध्ये End-to-end encryption नेमकं आहे तरी काय?जाणून घ्या हे कसं काम करतं)

नेटवर्क व्हेरिफाय करा -

जर तुम्ही कोणत्याही पब्लिक प्लेसवर वायफायचा वापर करत असाल, तर तुमचं वायफाय व्हेरिफाय असावं. व्हेरिफाय करण्यासाठी तुम्ही संबंधित अथॉरिटीकडून वायफाय व्हेरिफाय करू शकता. अनेकदा हॅकर्स फेक वायफाय बनवून लोकांचा पर्सनल डेटा चोरी करतात. चांगल्या सुरक्षेसाठी तुम्ही आयपी अ‍ॅड्रेसद्वारे वायफाय कनेक्ट करू शकता.

(वाचा - आता घरबसल्या मिळवा Aadhaar द्वारे तुमचं लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स)

HTTPS वेबसाईट -

कधीही पब्लिक वायफायचा वापर करत असाल, तर कोणतीही वेबसाईट ओपन करताना त्यापुढे https आहे का ते तपासा. वेब अ‍ॅड्रेसमध्ये https असल्यास, तुमचा डेटा सुरक्षित राहील आणि हॅकर्स चोरी करू शकणार नाहीत.

First published:

Tags: Internet, Internet use, Tech news