मुंबई, 11 जून : जर तुम्ही सोशल नेटवर्किंग साईटस (Social Networking Sites) फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आतापर्यंत मित्र, कुटुंबिय, नातेवाईक आदींच्या संपर्कात राहण्यासाठी तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रामुख्याने फेसबुक किंवा इन्स्टाग्रामचा वापर केला जात होता. तसेच मनोरंजन, माहितीसाठी देखील हे माध्यम वापरले जायचे. परंतु या माध्यमातून देखील कमाई करता येऊ शकते, याबाबत अनेक जणांना फारशी माहिती नाही. परंतु, आता तुम्ही या माध्यमातून घरबसल्या भरघोस कमाई (Income) करु शकता. इन्स्टाग्रामवर क्रिएटर्सला उत्पन्न मिळावे यासाठी फेसबुकने एक नवीन टूल लॉन्च केले आहे. याबाबत फेसबुकने सांगितले की इन्स्टाग्रामचे युजर्स कंपन्यांसोबत पार्टनरशिप करुन पैसे कमवू शकतात. त्याचबरोबर क्रिएटर्स (Creators) आणि एन्फ्लुएंसर्सला (Influencers) रिवॉर्डसदेखील दिले जाणार आहेत. कशी कराल कमाई? दिग्गज सोशल मीडिया कंपनी फेसबुकने घोषणा केली आहे की, क्रिएटर्स आता कंपन्यांसोबत पार्टनरशिप करु शकतील, तसेच ते आपल्याकडील वस्तूंची विक्री करुन आपल्या फॉलोअर्सच्या माध्यमातून पैसे कमवू शकणार आहेत. येथे त्यांच्या व्हिडीओसोबत दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून कमाईचा एक वाटा मिळवू शकतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील क्रिएटर्स आणि एन्फ्लुएंसर्सला त्यांनी केलेल्या खरेदीवर रिवॉर्डसदेखील (Rewards) दिले जाणार आहेत. फेसबुकने काय म्हटलंय जाणून घ्या फेसबुकने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय की, आम्ही क्रिएटर्सला मदत व्हावी यासाठी एका नव्या पध्दतीची घोषणा करीत आहोत. या माध्यमातून ते आमच्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपला वैयक्तिक ब्रँड तयार करु शकतील. आजपासून ते ठराविक ब्रँडच्या उत्पादनांना टॅग करु शकतील तसेच आपल्या उत्पादनासाठी शॉप टूल्स (Shop Tools) निवडू शकतील. जास्तीत जास्त क्रिएटर्सला शॉपिंग टूल्सचा अॅक्सेस (Access) देण्याचा कंपनीचा प्रयत्न असून, येथे त्यांना परचेस ड्राईव्हसाठी रिवॉर्ड देखील मिळतील, असे फेसबुकने जाहीर केले आहे. लाईव्हच्या माध्यमातून होऊ शकते कमाई या व्यतिरिक्त फेसबुकने ही देखील घोषणा केली आहे की इन्स्टाग्रामवर क्रिएटर्सने लाईव्हच्या (Live) माध्यमातून कोणत्याही दुसऱ्या अकाऊंटवर जाऊन बॅजेसचा वापर केला, तर त्यांना अतिरिक्त रक्कम मिळू शकेल. सध्या इन्स्टाग्राम बेनिफिट, कोपरी, मॅक, पॅट मॅकग्रा लॅब आणि सेफोरा यासह यूएसमधील कंपन्यांसोबत याची चाचणी घेणार आहे. त्यानंतर अन्य देशांमध्ये या सुविधेचा विस्तार करण्यासाठी आणखी ब्रँड्स समाविष्ट केले जातील. स्टार चॅलेंजच्या माध्यमातून कमवा पैसे फेसबुकचे क्रिएटर्स स्टार चॅलेंजचा (Star Challenge) वापर करुन पुरस्कार मिळवू शकतात. फेसबुकने हे स्टार चॅलेंज लॉन्च केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.