नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : जर तुम्हीही ई-कॉमर्स वेबसाइटवरुन ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) करत असाल, तर सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा मोठा फटका बसू शकतो. नुकतंच एक प्रकरण समोर आलं आहे. ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन इंडियाशी (Amazon India) संबंधित एक प्रकरण समोर आलं असून अनेकांनी याबाबत धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका ग्राहकाने अॅमेझॉनवरुन Apple Watch Series 7 आर्डर केलं. Apple Watch Series 7 ची किंमत तब्बल 50,999 रुपये आहे.परंतु ज्यावेळी प्रोडक्ट डिलीव्हर झालं, त्यावेळी हे प्रोडक्ट नकली असल्याचं लक्षात आलं. Apple Watch Series 7 च्या ऐवजी चिनी फेक वॉच रिसिव्ह झालं.
महत्त्वाची बाब म्हणजे अॅपल वॉच (Apple Watch) म्हणून डिलीव्हर झालेलं पार्सल ओपन करताना त्या ग्राहकाने अनबॉक्सिंग व्हिडीओ रेकॉर्ड (Unboxing Video) केला होता. त्यामुळे खरोखरचं नकली प्रोडक्ट आल्याचा पुरावा त्या ग्राहकाकडे आहे. अशाप्रकारचं प्रकरण पहिल्यांदाच झालेलं नाही, याआधीही अनेकदा अॅपल किंवा इतर अनेक प्रोडक्टबाबत अशा घटना समोर आल्या आहेत.
या ग्राहकाने त्याचा संपूर्ण अनुभव ट्विटरवर पोस्ट केला आहे. या ग्राहकाने अॅमेझॉन इंडियावरुन अॅपल वॉच सीरिज 7 जीपीएस + सेल्युलर मॉडलची ऑर्डर दिली आणि त्यासाठी 50,999 रुपयांचं पेमेंट केलं. प्रोडक्ट मिळाल्यानंतर ते खरं अॅपल वॉच नाही, तर नकली चिनी वॉच निघालं. ग्राहकाने काढलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे वॉच फेक असल्याचं दिसत होतं. ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार, नकली Apple Watch Series 7 चा सेलर Appario Retail होता.
फेक वॉच आल्यानंतर ग्राहकाने अॅमेझॉन कस्टमर केयर सेंटरमध्ये संपर्क केला आणि रिटर्नसाठी सांगितलं. त्यानंतर ऑथराइज्ड अॅपल सर्विस सेंटरमधून काही दिवसांनी रिटर्न ऑर्डर प्लेस करण्यात आली.
हे संपूर्ण प्रकरण अॅमेझॉन सोशल मीडिया टीम हँडल करेल असंही सांगितलं गेलं. अॅमेझॉन इंडियाच्या टीमने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 3 ते 5 वर्किंग डेजची आवश्यकता असेल असं ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. त्यानंतर काही दिवसांच्या तपासानंतर कंपनीने रिफंड देण्याचा निर्णय घेतला. अनबॉक्सिंग व्हिडीओमुळे Apple Watch ऐवजी फेक वॉच आल्याचा स्पष्ट पुरावा ग्राहकाकडे असल्याने व्हिडीओची त्याला मोठी मदत झाली.
या प्रकरणानंतर अॅमेझॉन प्रवक्त्यांनी ग्राहकाला Apple Watch साठी भरलेले संपूर्ण 50,999 रुपये परत करण्याचं सांगितलं. त्याशिवाय कंपनी त्या ग्राहकाला 1000 रुपयांचं एक अॅमेझॉन ऑफर कार्डही देण्यार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon, Apple, Online shopping, Smartwatch, Tech news