Home /News /technology /

Budget 2022: या वर्षात सुरू होणार 5G मोबाइल सर्विस, अर्थमंत्र्यांची घोषणा

Budget 2022: या वर्षात सुरू होणार 5G मोबाइल सर्विस, अर्थमंत्र्यांची घोषणा

या अर्थसंकल्पात 5G बाबत (5G network) मोठी घोषणा करण्यात आली आहे. 2022 मध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव झाल्यानंतर ही सर्विस 2022-23 मध्ये सुरू केली जाईल.

  नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister of India) संसदेत अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. त्यांनी मंगळवारी, 1 फेब्रुवारी रोजी चौथा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात 5G बाबतही (5G network) मोठी घोषणा करण्यात आली आहे. कित्येक दिवसांपासून 5G भारतात (5G in India) सुरू होण्याची चर्चा होती. अनेक टेलिकॉम कंपन्यांनी 5G साठी ट्रायलही सुरू केलं होतं. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 मध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होणार असल्याचं सांगितलं आहे. 2022 मध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव झाल्यानंतर ही सर्विस 2022-23 मध्ये सुरू केली जाईल. 5G साठी उत्सुक असलेल्या लोकांसाठी ही मोठी घोषणा आहे. सर्व गावांपर्यंत, लोकांपर्यंत इंटरनेटची पोहोच असावी असंही अर्थमंत्री म्हणाल्या. 5G च्या लाँचिंगसाठी काही योजना आणल्या जातील. PPP मॉडेलअंतर्गत गाव आणि रिमोट एरियामध्ये फायबर ऑपटिक्सद्वारे इंटरनेट पोहोचवलं जाईल, जेणेकरुन सर्वांनाच चांगली कनेक्टिविटी मिळेल.

  हे वाचा - Air India नंतर मोठ्या घाट्यात असलेली आणखी एक सरकारी कंपनी झाली रतन टाटांची

  टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) सतत 5G चं टेस्टिंग करत आहेत. या ट्रायलमध्ये हैराण करणारा स्पीड मिळत असल्याची माहिती आहे. 4G च्या तुलनेत 5G चा स्पीड 8 ते 10 टक्के फास्ट आहे. आता बजेटमध्ये 5G नेटवर्कची घोषणा झाल्यानंतर यावर्षी 5G सर्विस लोकांपर्यंत पोहोचणार हे निश्चित आहे. याआधी आलेल्या रिपोर्टनुसार, 5G नेटवर्क आधी भारतातील प्रमुख 13 शहरांत उपलब्ध केलं जाईल, अशा शहरांत कंपन्यांनी आधीच ट्रायल सुरू केलं आहे.

  हे वाचा - Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त? आणि काय महाग? वाचा सविस्तर...

  दरम्यान, देशभरात डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. यावर्षी देशात डिजिटल रुपया जारी केला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पादरम्यान केली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने डिजिटल रुपया आणण्यासाठी सर्व तयारी केली आहे. रिझर्व्ह बँक बिटकॉईनसारख्या डिजिटल चलनाला पर्याय देणार आहे. याच्या मदतीने डिजिटल चलनात सध्याचा धोका कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रिझर्व्ह बँक डिजिटल चलन सुरू करणार असल्याची माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: High speed internet, Internet, Union budget

  पुढील बातम्या