मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

केवळ Apple चा Logo नाही, हे तर आणखी एक बटण! वाचा iPhone च्या लेटेस्ट अपडेटबाबत

केवळ Apple चा Logo नाही, हे तर आणखी एक बटण! वाचा iPhone च्या लेटेस्ट अपडेटबाबत

iOS 14 अपडेटसह युजर आता iPhone च्या मागे असलेल्या Apple च्या logo चा वापर वर्चुअल बटणाप्रमाणे करू शकतात, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

iOS 14 अपडेटसह युजर आता iPhone च्या मागे असलेल्या Apple च्या logo चा वापर वर्चुअल बटणाप्रमाणे करू शकतात, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

iOS 14 अपडेटसह युजर आता iPhone च्या मागे असलेल्या Apple च्या logo चा वापर वर्चुअल बटणाप्रमाणे करू शकतात, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 6 मे: जर तुम्ही आयफोन युजर असाल, तर तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. iOS 14 अपडेटसह युजर आता iPhone च्या मागे असलेल्या Apple च्या logo चा वापर वर्चुअल बटणाप्रमाणे करू शकतात, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. जर फोन नुकत्याच आलेल्या नव्या अपडेटनुसार, अपडेट केला नसेल, तर iPhone अपडेट करुन एक्सेसिबिलिटी सर्विसेजच्या काही स्टेप्स फॉलो करुन त्या इनेबल कराव्या लागतील, त्यानंतरच हे फीचर वापरता येईल. या वर्चुअल बटणाच्या मदतीने युजर्स कमांड किंवा इतर काही कामं सहजपणे करू शकतील. युजर या नव्या बॅक टॅप फीचरच्या मदतीने होम, लॉक स्क्रिन, म्यूट, नोटिफिकेशन सेंटर, रिचॅबिलिटी, स्क्रिनशॉट, शेक, सिरी, स्पॉटलाईट, वॉल्यूम डाउन, वॉल्यूम अप, असिस्टेंट टच, क्लासिक इनवर्टर, मॅग्नीफायर, स्मार्ट इनवर्ट, स्पीक स्क्रीन, व्हॉईस-ओवर जूम, स्क्रॉल अप, स्क्रॉल डाउन,अ‍ॅप स्विचर आणि कंट्रोल सेंटर सारख्या कमांड देण्यासाठी अ‍ॅक्शन सिलेक्ट करू शकतात. कसं कराल बॅक टॅप फीचर इनेबल - - सर्वात आधी युजरला आपल्या iPhone च्या settings मध्ये जावं लागेल. त्यानंतर Accessibility सिलेक्ट करुन टचवर टॅप करावं लागेल. नंतर थोडं स्क्रोल करुन Back Tap वर टॅप करा.

(तुमची मुलंही स्मार्टफोन वापरतात? iOS हून 8 पटीने अधिक धोकादायक आहेत Android Apps)

आणखी एका एक्सेसिबिलिटी फीचर इनेबल करू शकता, जो Assistive Touch आहे. हा फोनच्या डिस्प्लेवर एका छोट्या मेन्यू बटणाप्रमाणे फ्लोट होतो, हे फीचर स्क्रिनवर रोटेट करता येतं. - हे फीचर इनेबल करण्यासाठी iPhone च्या settings मध्ये जावं लागेल. त्यानंतर Accessibility वर टॅप करा. त्यानंतर Assistive Touch करावं लागेल, किंवा या फीचरसाठी टॉगल ऑन करावं लागेल.

(वाचा - तुमचा iPhone लगेच करा अपडेट; अन्यथा बसू शकतो मोठा फटका)

- तसंच Accessibility Shortcut वर जावून Assistive टचवर टॅप करू शकता. (वाचा - iPhone युजर्सला आता मास्क घालूनच अनलॉक करता येणार फोन; नवं iOS अपडेट लाँच) दरम्यान, Apple ने iOS 14.5 नुकतंच रोलआउट केलं, ज्यात कोणत्याही  अ‍ॅपला जाहिरात दाखवण्यासाठी युजरची परवानगी घ्यावी लागेल. या अपडेटमध्ये iPhone युजर्स मास्क घालूनच फोन अनलॉक करू शकतील, अशी सुविधाही देण्यात आली आहे.
First published:

Tags: Apple, Iphone, Smartphone, Tech news

पुढील बातम्या