नवी दिल्ली, 5 मे : अॅपलने (Apple) नुकतंच iOS 14.5 अपडेट जारी केलं आहे. याच्या अपडेटसह काही नवे खास फीचर्सही देण्यात आले आहेत. आता अॅपलचं आणखी एक iOS 14.5.1 अपडेट उपलब्ध झालं आहे आणि हे त्वरित अपडेट करणं गरजेचं आहे. कारण हे अपडेट न केल्यास काही समस्या येऊ शकतात, असं सांगण्यात आलं आहे.
iOS 14.5.1 अपडेटसह दोन त्रुटी दुरुस्त करण्यात आल्याचं अॅपलने सांगितलं आहे. काही त्रुटींमुळे हॅकर्स युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये कमांड रन करू शकतात. त्यामुळे हे अपडेट करणं आवश्यक आहे. अन्यथा हॅकर्सकडून युजर्सला टार्गेट केलं जाऊ शकतं.
iOS 14.5.1 सह iPad OS 14.5.1 अपडेट देखील आलं आहे. जर युजरकडे आयपॅड असेल, तर तोदेखील अपडेट करावा लागेल. काही असा वेब कंटेट रन केला जात आहे, ज्याद्वारे फोनमध्ये कोड एग्जिक्यूशन केलं जाऊ शकतं.
कसं कराल अपडेट -
- युजर आयफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन नवं अपडेट इन्स्टॉल करू शकतात.
- यासाठी सेटिंग्जमध्ये जावं लागेल.
- त्यानंतर जनरल ऑप्शनवर टॅप करावं लागेल.
- सॉफ्टवेअर अपडेटवर गेल्यानंतर नवं वर्जन दिसेल.
- हे अपडेट लहान असल्याने, अपडेट होण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही.
हॅकर्सपासून वाचण्यासाठी तसंच फोन सुरक्षित ठेवण्यासाठी हे अपडेट करणं महत्त्वाचं ठरत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.