मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! Joker Malware पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, Android Smartphone मधून लगेच डिलीट करा हे App

Alert! Joker Malware पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, Android Smartphone मधून लगेच डिलीट करा हे App

जर तुम्हीही Android Smartphone युजर्स असाल, तर सावध राहण्याची गरज आहे. धोकादायक जोकर मालवेअर केवळ डेटाच नाही, तर बँक अकाउंटमधील पैसेही उडवू शकतो.

जर तुम्हीही Android Smartphone युजर्स असाल, तर सावध राहण्याची गरज आहे. धोकादायक जोकर मालवेअर केवळ डेटाच नाही, तर बँक अकाउंटमधील पैसेही उडवू शकतो.

जर तुम्हीही Android Smartphone युजर्स असाल, तर सावध राहण्याची गरज आहे. धोकादायक जोकर मालवेअर केवळ डेटाच नाही, तर बँक अकाउंटमधील पैसेही उडवू शकतो.

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : Android Smartphone साठी Joker वायरस मागील कित्येक वर्षांपासून धोकादायक ठरत आहे. हा Joker Malware पुन्हा एकदा अ‍ॅक्टिव्ह झाला असून प्ले स्टोरवरील अनेक Apps ला इन्फेक्टेड करत आहे. जर तुम्हीही Android Smartphone युजर्स असाल, तर सावध राहण्याची गरज आहे. धोकादायक जोकर मालवेअर केवळ डेटाच नाही, तर बँक अकाउंटमधील पैसेही उडवू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, Joker Malware एका App मध्ये आढळला असून हे App जवळपास 5 लाख वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. या डाउनलोडमुळे अनेक अँड्रॉइड युजर्स जोकर मालवेअरमुळे प्रभावित होऊ शकतात.

Google Play Store वर कलर मेसेज नावाचं एक App आहे, जे जोकर मालवेअरमुळे इन्फेक्टेड आहे. या App मध्ये SMS, Text Messages इमोजीसह अतिशय मजेशीर होण्याचा दावा करण्यात आला आहे. मोबाइल सिक्योरिटी कंपनी Pradeo ने दिलेल्या माहितीनुसार, हे App लोकांना Fun and Beautiful मेसेजिंगचा अनुभव देण्याच्या नावाखाली युजर्सचा फोन जोकर मालवेअरने इन्फेक्ट करत आहे.

Google Chrome ची Online Shoppingसाठी मदत; सर्वात आधी देणार स्वस्त वस्तूची माहिती

या सिक्योरिटी फर्मने Joker Malware फ्लीसवेयर कॅटेगरीमध्ये ठेवला आहे. फ्लीसवेयर हा मालवेअरचा एक प्रकार असून याद्वारे मोबाइल App हिडन सब्सक्रिप्शन फीससह तयार केला जातं. अशात सब्सक्रिप्शनच्या नावाने हे App युजरच्या अकाउंटमधून हळू-हळू पैसे उडवण्याचं काम करतं. हे App युजरला फ्लीसवेयर मालवेअरद्वारे Paid Service वर क्लिक करण्यास भाग पाडतं आणि युजर नको असतानाही प्रीमियम सर्विस सब्सक्राइब करतो आणि अकाउंटमधून पैसे गेल्याचं नंतर लक्षात येतं.

UPI Payment करताना राहा अलर्ट, छोटी चूकही रिकामं करेल तुमचं बँक अकाउंट

जर तुम्हीही Color Messages App स्मार्टफोनमध्ये डाउनलोड केलं असेल, तर लगेच डिलीट करा. लाखो वेळा हे App डाउनलोड करण्यात आलं आहे. App हटवणंही कठीण असून जर तुम्ही सब्सक्रिप्शन सर्विस अ‍ॅक्टिव्ह केली असेल, तर आधी ती कॅन्सल करावी लागेल. यासाठी Google Play Store ओपन करुन सब्सक्रिप्शन मेन्यूवर जा. इथे सब्सक्रिप्शन कॅन्सल करा.

First published:
top videos

    Tags: Android, Malware, Smartphone, Tech news