मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

UPI Payment करताना राहा अलर्ट, छोटी चूकही रिकामं करेल तुमचं बँक अकाउंट

UPI Payment करताना राहा अलर्ट, छोटी चूकही रिकामं करेल तुमचं बँक अकाउंट

सध्या तुमचा फोनचं वॉलेट किंवा बँक अकाउंट आहे. त्यामुळे स्मार्टफोनमधून ट्रान्झेक्शन करताना सावध राहण्याची गरज आहे.

सध्या तुमचा फोनचं वॉलेट किंवा बँक अकाउंट आहे. त्यामुळे स्मार्टफोनमधून ट्रान्झेक्शन करताना सावध राहण्याची गरज आहे.

सध्या तुमचा फोनचं वॉलेट किंवा बँक अकाउंट आहे. त्यामुळे स्मार्टफोनमधून ट्रान्झेक्शन करताना सावध राहण्याची गरज आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : भारतात ऑनलाइन, डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. ऑनलाइन पेमेंट करणं जितकं सहज-सोपं आहे, तितकंच यात अलर्ट राहण्याचीही गरज आहे. छोटी चूक, बेजबाबदारपणा तुमचं खातं रिकामं करू शकते. सध्या तुमचा फोनचं वॉलेट किंवा बँक अकाउंट आहे. त्यामुळे स्मार्टफोनमधून ट्रान्झेक्शन करताना सावध राहण्याची गरज आहे.

UPI Address -

सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी कोणाशीही आपला UPI अॅड्रेस शेअर करू नका. तुमचा UPI Address, फोन नंबर, क्यूआर कोड किंवा वर्चुअल पेमेंट अॅड्रेसमध्ये काहीही गडबड होऊ शकते. अनेकदा फ्रॉड करणारे बँकेतून बोलत असल्याचं सांगून पर्सनल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु बँकेतून कधीही अशाप्रकारे माहिती विचारली जात नाही. त्यामुळे अशी पर्सनल माहिती कोणाशीही शेअर करू नका.

Cyber Dost Alert!सेकंदात गायब होऊ शकते तुमची कमाई,हे App चुकूनही डाउनलोड करू नका

UPI App अपडेट -

अनेक जण पेमेंटसाठी ज्या App चा वापर करतात, ते अपडेट ठेवत नाहीत. परंतु Mobile App अपडेट ठेवणं गरजेचं आहे. UPI Payment App लेटेस्ट वर्जनमध्ये अपग्रेट करणं गरजेचं आहे. Apps लेटेस्ट वर्जनमध्ये अपग्रेट केल्याने तुमचं अकाउंटही सुरक्षित राहतं.

अनेक Apps चा वापर करू नका -

डिजीटल पेमेंट किंवा ट्रान्झेक्शनसाठी अनेक Apps चा वापर करू नका. अनेकदा अनेक Apps चा वापर करताना चूक होण्याची शक्यता असते. App मध्ये समस्या आल्यास हेल्प सेंटरची मदत घ्या. कोणत्याही बाहेरील व्यक्तीची यासाठी मदत घेऊ नका.

Google Chrome ची Online Shoppingसाठी मदत; सर्वात आधी देणार स्वस्त वस्तूची माहिती

अनोळखी लिंक किंवा फेक कॉल -

कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. UPI स्कॅमचा वापर करून हॅकर्स युजर्सची फसवणूक करतात. हॅकर्स युजरसह एक लिंक शेअर करतात किंवा कॉल करतात आणि वेरिफिकेशनसाठी लिंकद्वारे एक नवं App डाउनलोड करण्यासाठी सांगतात. परंतु अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. बँका किंवा इतर वित्तीय संस्था ग्राहकांची खासगी माहिती ओटीपी, पीन नंबर असे डिटेल्स मागत नाहीत.

First published:

Tags: Online payments, Tech news, Upi