जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Jio चा जबरदस्त प्लॅन; वर्षभर अनलिमिटेड फ्री कॉलिंग, हायस्पीड इंटरनेट आणि बरंच काही...

Jio चा जबरदस्त प्लॅन; वर्षभर अनलिमिटेड फ्री कॉलिंग, हायस्पीड इंटरनेट आणि बरंच काही...

Jio चा जबरदस्त प्लॅन; वर्षभर अनलिमिटेड फ्री कॉलिंग, हायस्पीड इंटरनेट आणि बरंच काही...

रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी काही ऑफर्स जारी केल्या आहेत. या ऑफर्सअंतर्गत युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग (Unlimited calling) आणि डेली डेटासह (Daily data) इतर काही फायदेही मिळणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 मार्च : रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी काही ऑफर्स जारी केल्या आहेत. या ऑफर्सअंतर्गत युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग (Unlimited calling) आणि डेली डेटासह (Daily data) इतर काही फायदेही मिळणार आहेत. कंपनीने 749 रुपयांचा एक प्लॅन लाँच केला आहे, ज्यात युजर्सला एक वर्षापर्यंत इंटरनेट, कॉल आणि मेसेजसह सर्व सेवा मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या रिचार्ज प्लॅनची वॅलिडिटी वर्षभर आहे. 749 रुपयांचा रिचार्ज प्लॅन Jio Phone युजर्ससाठी आहे. जर तुमच्याकडे Jio Phone असेल, तर तुम्ही 749 रुपयाचा प्लॅन घेऊ शकता. या प्लॅनमध्ये Jio Phone चे ग्राहक 749 रुपये खर्च करुन एक वर्ष अर्थात 12 महिन्यांपर्यंत अनलिमिटेड सर्विसचा फायदा घेऊ शकतात.

(वाचा -  हरवलेला फोन कसा शोधाल? डिलीटही करू शकता चोरी झालेल्या फोनचा डेटा )

या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी दर महिन्याला 2GB हाय स्पीड डेटा दिला जाईल. तसंच युजरला वर्षभर अनलिमिटेड फ्री कॉलिंगही मिळेल. याचा 2GB डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होईल. ही ऑफर रिलायन्स रिटेल स्टोर आणि Jio रिटेल स्टोरमधून घेता येईल.

(वाचा -  Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन; केवळ 3.5 रुपयांत 1 GB डेटा आणि बरंच काही… )

22 रुपये डेटा प्लॅन - Jio ने युजर्ससाठी केवळ 22 रुपयांचा डेटा प्लॅन लाँच केला आहे, ज्यात युजर्सला 2GB 4G हायस्पीड डेटा मिळतो. या प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये 2GB डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps होतो.

(वाचा -  Logout करायचं विसरलात? असं जाणून घ्या किती सिस्टममध्ये आजही ओपन आहे तुमचं Gmail )

22 रुपयांच्या या प्लॅनमध्ये Jio फोन युजर्सला JioNews, Jio Security, JioCinema, आणि JioTV Apps चं सब्सक्रिप्शनही मिळतं. युजर्सला या प्लॅनसोबत केवळ डेटा बेनिफिट मिळतो. परंतु वॉईस कॉलसाठी वेगळा रिचार्ज करावा लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात