जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Logout करायचं विसरलात? असं जाणून घ्या किती सिस्टममध्ये आजही ओपन आहे तुमचं Gmail

Logout करायचं विसरलात? असं जाणून घ्या किती सिस्टममध्ये आजही ओपन आहे तुमचं Gmail

या पेजवर स्क्रोल करुन सर्वात खाली आल्यानंतर तुमच्याकडून वापरल्या गेलेल्या gmail ची माहिती मिळेल. याच माहितीच्या बाजूला Details दिसतील. त्या लाईनमध्ये Last Account Acitivity पर्याय दिसेल. त्यानंतर डिटेल्सवर क्लिक करावं लागेल.

Gmail Account दुसरीकडे लॉग-आउट करायचं राहिलं असेल, तरी मोबाईलवरच कुठेही ओपन असलेलं तुमचं जीमेल अकाउंट लॉग-आउट करता येऊ शकतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 मार्च : जीमेल (Gmail) अकाउंटचा वापर कुठेही करावा लागू शकतो. अनेकदा असं होतं की, आपण बाहेर दुसरीकडे एखाद्या सायबर कॅफेमध्ये किंवा इतर ठिकाणी जीमेल अकाउंट लॉग-इन तर करतो, परंतु लक्षात न राहिल्याने ते लॉग-आउट करायंच राहून जातं. नंतर आठवलं तरी पुन्हा त्याठिकाणी जाउन लॉग-आउट करणं शक्य होत नाही. अशावेळी मेलमधील वैयक्तिक माहिती कोणी पाहिली किंवा गैरवापर झाला तर… अशी भीती वाटू लागते. परंतु आता असं झालं तरीही घाबरण्याची गरज नाही. दुसरीकडे लॉग-आउट करायचं राहिलं असेल, तरी मोबाईलवरच कुठेही ओपन असलेलं तुमचं जीमेल अकाउंट लॉग-आउट करता येऊ शकतं. मोबाईलवर करा लॉगइन - तुमचं Gmail अकाउंट किती लॅपटॉप, डेस्कटॉपवर सुरू आहे, याची माहिती मिळवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलवरच याची माहिती मिळेल. यासाठी मोबाईलच्या Gmail App वर नाही, तर गुगल क्रोमवर Gmail सुरू करावं लागेल. येथे जीमेल अकाउंट आयडी आणि पासवर्ड टाका. गुगल क्रोमवर लॉग-इन केल्यानंतर एक पेज दिसेल. तिथे स्क्रोल करत सर्वात खाली जावं लागेल. तिथे View Gmail in: Mobile/ Older version/Desktop दिसेल. आता Desktop वर क्लिक करा. त्यानंतर ज्याप्रमाणे डेस्कटॉपवर gmail दिसतात, तसे सर्व मेल एकत्र दिसतील.

(वाचा -  तुम्हालाही असा मेसेज आला का? VIP Numbers द्वारे होतेय मोठी फसवणूक )

या पेजवर स्क्रोल करुन सर्वात खाली आल्यानंतर तुमच्याकडून वापरल्या गेलेल्या gmail ची माहिती मिळेल. याच माहितीच्या बाजूला Details दिसतील. त्या लाईनमध्ये Last Account Acitivity पर्याय दिसेल. त्यानंतर डिटेल्सवर क्लिक करावं लागेल.

(वाचा -  Facebook युजर्ससाठी मोठी बातमी! आता फेसबुक वापरण्यापूर्वी करावं लागेल हे काम )

डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर एक पेज दिसेल, जिथे gmail recent actiivty दिसेल. त्यामध्ये तुमचं जीमेल अकाउंट कोणत्या ब्राउजरवर, कोणत्या आयपी अॅड्रेसवर किती वेळ सुरू होतं हे दिसेल. परंतु हे किती सिस्टममध्ये अद्यापही सुरू आहे, हे पाहण्यासाठी Security Checkup वर क्लिक करावं लागेल. येथे Your devices वर क्लिक करुन, सर्व सिस्टमची माहिती मिळेल, जिथे तुमचं gmail account ओपन आहे. येथेच साइड पॅनेलवर क्लिक करुन ते लॉग-आउट करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: gmail
  • First Published :
जाहिरात
जाहिरात