मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन; केवळ 3.5 रुपयांत 1 GB डेटा आणि बरंच काही...

Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन; केवळ 3.5 रुपयांत 1 GB डेटा आणि बरंच काही...

स्वस्त प्लॅन्स म्हटलं की रिलायन्स जिओचं (Reliance Jio) नाव नेहमीच आधी घेतलं जातं. जिओचा एक रिचार्ज पॅक असा आहे, की ज्यात एक जीबी डेटा केवळ साडेतीन रुपयांत मिळतो.

स्वस्त प्लॅन्स म्हटलं की रिलायन्स जिओचं (Reliance Jio) नाव नेहमीच आधी घेतलं जातं. जिओचा एक रिचार्ज पॅक असा आहे, की ज्यात एक जीबी डेटा केवळ साडेतीन रुपयांत मिळतो.

स्वस्त प्लॅन्स म्हटलं की रिलायन्स जिओचं (Reliance Jio) नाव नेहमीच आधी घेतलं जातं. जिओचा एक रिचार्ज पॅक असा आहे, की ज्यात एक जीबी डेटा केवळ साडेतीन रुपयांत मिळतो.

    नवी दिल्ली, 21 मार्च : काही वर्षांपूर्वी ज्यावेळी मोबाईल सर्वसामान्यांच्या आवाक्यात नव्हता, तेव्हा रिलायन्सने (Reliance) सर्वांत स्वस्त फोन आणि प्लॅन्स सादर करून या क्षेत्रात जणू क्रांतीच केली. त्यामुळे या क्षेत्रातली स्पर्धा वाढली आणि ग्राहकांना त्याचा चांगला लाभ झाला. स्पर्धा वाढण्याचा ट्रेंड अजूनही कायम असून, स्पर्धेचे निकष बदलत चालले आहेत. अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, असलेले ग्राहक टिकवण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा देणारे स्वस्त दरातील प्लॅन्स सादर करत आहेत. स्वस्त प्लॅन्स म्हटलं की रिलायन्स जिओचं (Reliance Jio) नाव नेहमीच आधी घेतलं जातं. जिओचा एक रिचार्ज पॅक असा आहे, की ज्यात एक जीबी डेटा केवळ साडेतीन रुपयांत मिळतो.

    599 चा रिचार्ज प्लॅन

    रिलायन्स जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. 599 रुपयांच्या या प्लॅनची सध्या (599 Recharge Pack) चर्चा आहे. या प्लॅनमध्ये दररोज दोन जीबी डेटा वापरण्यासाठी उपलब्ध केला जातो. त्यामुळे 84 दिवसांत 168 जीबी डेटा (Data) ग्राहकांना वापरण्यासाठी मिळतो. त्यामुळे 599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक जीबी डेटासाठी सरासरी केवळ 3.57 रुपयेच मोजावे लागतात.

    (वाचा - तुम्हालाही असा मेसेज आला का? VIP Numbers द्वारे होतेय मोठी फसवणूक)

    इतर प्लॅन्सच्या तुलनेत स्वस्त

    अन्य डेटा प्लॅन्सशी तुलना केली, तर हा प्लॅन खूप स्वस्त पडतो. जिओच्याच 444 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे. त्यामुळे एकूण 112 जीबी डेटा मिळतो. एक जीबी डेटाची किंमत सरासरी चार रुपये एवढी होते. तसंच, डेटाचा विचार करता 249 रुपयांच्या प्लॅनपेक्षाही 599 रुपयांचा प्लॅन स्वस्त पडतो.

    (वाचा - Jio, Airtel, Viच्या या स्वस्त प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime सबस्क्रिप्शन फ्री)

    इतर फायदे

    599 रुपयांच्या प्लॅनचे आणखीही काही फायदे आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. शिवाय ग्राहकांना जिओच्या काही अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेसही मोफत मिळतो. त्यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सावन, जिओ न्यूज, जिओ क्लाउड (JioTV, Jio Cinema, JioSaavn, JioNews, JioCloud) यांसारख्या अ‍ॅप्सच्या मोफत सबस्क्रिप्शनचा (Free Subscription) समावेश आहे.

    First published:

    Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet, Reliance jio postpaid