नवी दिल्ली, 29 मे : भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) प्रमुख, सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. खासगी किंवा कोणत्याही सरकारी कामासाठी आधार कार्डची गरज लागते. त्यामुळे ते सांभाळून ठेवणंही तितकंच गरजेचं आहे, अन्यथा याचा चुकीचा वापरही केला जाण्याची शक्यता असते. तुमच्या आधार कार्डचा कोणी दुसराच व्यक्ती वापर तर करत नाही ना? आणि याबाबत तुम्हाला माहिती नाही. तुमचं आधार कार्ड मागील सहा महिन्यात कुठे वापरलं तर गेलं नाही ना? याबाबत तुम्ही माहिती घेऊ शकता. असं झालं असल्यास त्याबाबत तक्रारही करता येऊ शकते. तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर तर केला जात नाही ना, असं ओळखा - UIDAI च्या वेबसाईटवर हे फीचर उपलब्ध आहे. याद्वारे घरबसल्या तुम्ही तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर केला गेला नाही ना याची माहिती घेऊ शकता. तसंच तुमच्या आधार कार्डचा कधी आणि कुठे वापर झाला हेदेखील समजू शकतं. - सर्वात आधी https://resident.uidai.gov.in/notification-aadhaar या लिंकवर क्लिक करुन ओपन करा. - त्यानंतर ‘Aadhaar Authentication History’ च्या खाली असलेल्या बॉक्समध्ये 12 अंकी आधार नंबर भरा.
(वाचा - लॉकडाउनमध्येच Aadhaar Card हरवलं? कुठेही न जाता घरबसल्या असं बनवा नवं आधार कार्ड )
- त्यानंतर चार अंकी सिक्योरिटी कोड टाका. - त्यानंतर ‘Generate OTP’ वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. - आता समोर एक नवं पेज ओपन होईल, जिथे ऑथेंटिकेशन टाईप, सिलेक्ट डेट रेंज, नंबर ऑफ रेकॉर्ड आणि OTP भरण्यासाठी सांगितलं जाईल.
(वाचा - बाजूच्या व्यक्तीलाही कळणार नाही तुम्ही WhatsAppवर काय बोलताय!असं लपवा पर्सनल चॅट )
- त्यानंतर समोर ओपन झालेल्या पेजच्या ड्राप-डाउन मेन्यूमधून ‘All’ पर्याय निवडा. - आता ‘Authentication Type’ मध्ये ड्राप-डाउनमध्ये ‘All’ ऑप्शन सिलेक्ट करा. - पेजवर दिसत असलेल्या ‘Select Date Range’ वर क्लिक करा. इथे तुम्ही अधिकाधिक 6 महिन्यापूर्वीची माहिती मिळवू शकता. - त्यानंतर ‘Submit’ वर क्लिक करा.
(वाचा - कोरोना लशीसाठी तुम्ही ज्या Cowinवर नोंदणी करताय ते फेक नाही ना? अशी ओळखा Website )
- आता ‘Number of Records’ दिसतील, ते भरुन इथे जास्तीत-जास्त 50 रेकॉर्ड्सची माहिती घेता येईल. - ऑथेंटिकेशनसाठी OTP टाका आणि पुन्हा सबमिटवर क्लिक करा. - इथे संपूर्ण माहिती मिळेल, की कधी आणि कुठे तुमच्या आधार कार्डचा वापर केला गेला आहे. यात तुमच्या आधार कार्डचा कोणी दुरुपयोग केला असल्यास, त्याबाबत तक्रार करता येईल.