मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

बाजूच्या व्यक्तीलाही पत्ता नाही लागणार तुम्ही WhatsApp वर काय बोलताय! असं लपवा तुमचं पर्सनल चॅट

बाजूच्या व्यक्तीलाही पत्ता नाही लागणार तुम्ही WhatsApp वर काय बोलताय! असं लपवा तुमचं पर्सनल चॅट

कोणत्याही अनोळखी नंबरवरुन आलेल्या मेसेजवर रिप्लाय करताना सावधगिरी बाळगा. आजकाल फ्रॉड करणारे वेगवेगळ्या कंट्री कोडचा वापर करुन लोकांची फसवणूक करत आहेत.

कोणत्याही अनोळखी नंबरवरुन आलेल्या मेसेजवर रिप्लाय करताना सावधगिरी बाळगा. आजकाल फ्रॉड करणारे वेगवेगळ्या कंट्री कोडचा वापर करुन लोकांची फसवणूक करत आहेत.

अनेकांना आपलं प्रायव्हेट चॅट दुसऱ्यांपासून लपवायचं असतं. पर्सनल चॅट सिक्रेट ठेवायचे असतात, जेणेकरुन इतर कोणी व्यक्ती ते पाहू शकत नाही. एका ट्रिकद्वारे तुमचं पर्सनल चॅट, पर्सनलच राहण्यास मदत होऊ शकते.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 29 मे : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅपचा मोठा युजरबेस असून तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण व्हॉट्सअ‍ॅपचा मेसेजिंगसाठी वापर करतात. परंतु अनेकांना आपलं प्रायव्हेट चॅट दुसऱ्यांपासून लपवायचं असतं. पर्सनल चॅट सिक्रेट ठेवायचे असतात, जेणेकरुन इतर कोणी व्यक्ती ते पाहू शकत नाही. एका ट्रिकद्वारे तुमचं पर्सनल चॅट, पर्सनलच राहण्यास मदत होऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅप सध्या आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे चर्चेत आहे. या दरम्यान सिंग्नल, टेलिग्रामसारख्या व्हॉट्सअ‍ॅपच्या इतर प्रतिस्पर्धींनी अनेकदा आपल्या युजरबेसमध्ये वाढ झाल्याचा दावा केला आहे. परंतु भारतात व्हॉट्सअ‍ॅपचा मोठा वर्ग असून व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियताही अधिक आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचं सिक्रेट चॅट कोणीही वाचू शकत नाही -

कधी तुम्ही ट्रेन, बसमध्ये असाल तर चॅटिंग करताना अनेकदा बाजूचा व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये बघण्याची शक्यता असते. अशावेळी पर्सनल चॅट करताना, आपण काय टाईप करतो, बोलतोय ते तो सहजपणे वाचू शकतो. परंतु व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचं चॅट अशाप्रकारे इतर कोणी पाहू नये, यासाठी युजर्स 'MaskChat - Hide Whatsapp Chat' अ‍ॅपचा वापर करू शकतात. हे अ‍ॅप स्क्रिनवर एक वर्च्युअल पडदा लावतं, ज्यामुळे तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती, तुम्ही काय चॅट करता ते वाचू शकत नाही. या अ‍ॅपमध्ये वर्च्युअल पडद्याची जाडी कमी-जास्त करण्याचाही पर्याय आहे.

(वाचा - कोरोना लशीसाठी तुम्ही ज्या Cowinवर नोंदणी करताय ते फेक नाही ना? अशी ओळखा Website)

WhatsApp Chat कसं कराल हाईड -

तुमचा मोबाईल कधी दुसऱ्या व्यक्तीकडे असेल, आणि अशावेळी तुमचं प्रायव्हेट चॅट त्यांच्यापासून लपवण्यासाठी पर्सनल चॅट बंद ठेवा आणि त्यावर क्लिक करा. त्यानंतर वरच्या बाजूला अर्काइवचा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा. असं केल्याने चॅट हाईड (Hide Chat) होईल. त्याशिवाय पर्सनल चॅट दुसऱ्यांच्या नजरेपासून दूर ठेवण्यासाठी चॅट नोटिफिकेशन अलर्टही बंद करू शकता.

(वाचा - खरंच सरकार तुमचे WhatsApp कॉल, मेसेज चेक करणार?वाचा त्या व्हायरल मेसेजमागचं सत्य)

दरम्यान, काही थर्ड पार्टी अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप चॅट हाईड करण्यासाठी फीचर देण्याचा दावा करतात. थर्ड पार्टीचा अ‍ॅपचा वापर करणं किंवा अनोळखी सोर्सवरुन अ‍ॅप इन्स्टॉल करण धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे गुगल प्ले स्टोरवर असलेल्या अ‍ॅपचा वापर करावा.

First published:

Tags: Whatsapp, WhatsApp chats, WhatsApp features, Whatsapp messages