मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /कोरोना लशीसाठी तुम्ही ज्या Cowin वर नोंदणी करताय ते फेक तर नाही ना? अशी ओळखा Website

कोरोना लशीसाठी तुम्ही ज्या Cowin वर नोंदणी करताय ते फेक तर नाही ना? अशी ओळखा Website

संकटकाळात फसवणूक करणाऱ्यांकडून काही औषधांसाठी अधिक पैसे घेतलं जात आहे, तर काही फ्रॉडस्टर्स पैसे घेऊनही बनावट औषधांची विक्री करत आहेत. आता पुन्हा फसवणुकीचं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात वॅक्सिनेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या वेबसाईटच्या नावेच फसवणूक केली जात आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 27 मे : देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा कहर (Coronavirus In India) सुरू असताना लसीकरणही (Vaccination) सुरू आहे. भारतात आतापर्यत 20 कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे. याचदरम्यान काही फ्रॉडस्टर्सचा ग्रुपही अ‍ॅक्टिव्ह आहे. या संकटकाळात फसवणूक करणाऱ्यांकडून काही औषधांसाठी अधिक पैसे घेतलं जात आहे, तर काही फ्रॉडस्टर्स पैसे घेऊनही बनावट औषधांची विक्री करत आहेत. आता पुन्हा फसवणुकीचं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात वॅक्सिनेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या वेबसाईटच्या नावेच फसवणूक केली जात आहे.

अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात कोविडविरोधी लसीकरणासाठी एक बनावट, फेक वेबसाईटची लिंक मेसेज करुन फसवणूक केली जात आहे. ही लिंक ओपन केल्यानंतर अगदी सेम तशीच दिसते, जशी भारत सरकारकडून जारी करण्यात आलेली अधिकृत वेबसाईट दिसते.

वॅक्सिनेशन रजिस्ट्रेशन आणि शेड्युल करण्यासाठी येणाऱ्या समस्यांमुळे या बनावट वेबसाईट्सद्वारे लोकांचा फायदा घेतला जात आहे. एवढंच नाही, तर अनेक लोकांची लाखो रुपयांना फसवणूक केली आहे. राजधानी दिल्लीत पोलिसांनी असं कृत्य करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

(वाचा - सावधान! Corona Vaccine घेतल्यानंतर तुम्ही अशी चूक करू नका; मोदी सरकारकडून इशारा)

कसं ओळखाल वेबसाईट असली आहे की नकली -

- जर कधी एखाद्याने मेसेजद्वारे एखादी शॉर्ट लिंक पाठवून, त्या लिंकद्वारे वॅक्सिनेशनसाठी रजिस्ट्रेशन करण्याचा दावा केल्यास, अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर, त्या लिंकचा URL संपूर्ण तपासा. जर भारत सरकारची वेबसाईट असेल, तर त्यात डॉटनंतर gov.in लिहिलेलं असेल.

- उदा. कोविनची खरी सरकारकडून अधिकृत असलेली वेबसाईट https://www.cowin.gov.in/ अशी आहे.

- ही अशी वेबसाईट http://www.cowin.in भारत सरकारची नाही.

- तसंच, जर URL मध्ये cowin आहे, परंतु त्यात डॉटच्या पुढे in, org, com लिहिलेलं असेल, तर त्यावरही विश्वास ठेऊ नका.

- एखाद्या मेसेजमध्ये लिंक पाठवल्यानंतर URL मध्ये https आहे, की http हेदेखील तपासा. जर URL मध्ये https असेल, तर ती सिक्योर्ड वेबसाईट असेल.

- कोविनची असली वेबसाईट कोणती हे तपासायचं असल्यास, गुगल सर्च इंजिनवर cowin.gov.in सर्च करा. सर्च रिझल्टमध्ये सर्वात आधी भारत सरकारची अधिकृत वेबसाईट येईल.

- त्याशिवाय, आरोग्य मंत्रालयाची वेबसाईट https://www.mohfw.gov.in/, फेसबुक पेज https://www.facebook.com/MoHFWIndia वरुन वॅक्सिनेशनबाबत माहिती घेऊ शकता.

(वाचा - वेळेसह होईल इंधनाची बचत; Google Maps चं जबरदस्त फीचर)

या वेबसाईट्स, अ‍ॅप्सपासून सावधान -

Covid-19.apk

Vaci_Regis.apk

MyVaccin_v2.apk

Cov-Regis.apk

Vecin-Apply.apk

https://app.preprod.co-vin.in/login

selfregistration.preprod.co-vin.in

https://selfregistration.sit.co-vin.in

http://tiny.cc/COVID-VACCINE

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Coronavirus, Tech news