नवी दिल्ली, 1 जुलै : WhatsApp आणि Facebook या दोन गोष्टी जवळपास सर्वांसाठीच दररोजच्या वापरातल्या भाग बनल्या आहेत. पर्सनल चॅटसाठी WhatsApp आणि मेसेंजर दोन्हीही वापरलं जातं. सर्वसाधारणपणे लोक मेसेंजर वापरण्यासाठी फेसबुक लॉगइनचा वापर करतात. परंतु विना फेसबुक अकाउंटही फोन नंबरवरुन डायरेक्ट मेसेंजरसाठी साइनअप करण्याची सुविधा मेसेंजर देतं.
तुमचं व्हॉट्सअप किंवा फेसबुक अकाउंट दुसरं कोणी वापरत असेल तर? अनेकदा ही तुमच्या ओळखीचीच लोकंही असू शकतात. अशात तुमचे चॅट्स कोणी वाचू शकत असल्याचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे तुमचं Facebook आणि WhatsApp अकाउंट इतर कोणी वापरत तर नाही ना? हे तपासणं गरजेचं आहे.
Facebook -
- Facebook वर Login करुन अकाउंट सेटिंग्समध्ये जा.
- इथे सिक्योरिटी सेक्शनमध्ये Security and login वर टॅप करा.
- इथे तुमचं अकाउंट इतर किती अकाउंट्सशी login आहे हे दिसेल. जर हे सर्व डिव्हाईस तुमचेच असतील तर कोणतीही समस्या नाही. परंतु या लिस्टमध्ये दिसत असलेले डिव्हाईस तुम्ही लॉगइन केले नसतील, तर ते इतर कोणी वापरत असल्याचं असू शकतं.
- या लिस्टमध्ये सर्वात खाली Log out of all sessions वर टॅप करा. असं केल्याने तुमचं अकाउंट कितीही डिव्हाईसमध्ये लॉगइन असेल, तर ते लॉगआउट होईल. तुमच्या फोनमधूनही लॉगआउट झाल्यास, पुन्हा आयडी-पासवर्ड टाकून लॉगइन करू शकता. त्यानंतर पासवर्ड बदला.
WhatsApp -
व्हॉट्सअॅपचा अॅक्सेस चुकून दुसऱ्याच्या हातात गेला, तर तुमचं अकाउंट वापरलं जाऊ शकतं. हे शक्यतो WhatsApp Web द्वारे केलं जातं. व्हॉट्सअॅप वेबसाठी अनेक थर्ड पार्टी अॅप आहेत, जे मोबाईलवर व्हॉट्सअॅप वेबचा अॅक्सेस घेऊ शकतात.
त्यामुळे वेळोवेळी आपल्या मोबाईल फोनवरुन व्हॉट्सअॅपमध्ये वेब सेशन लॉगआउट करावं लागेल. त्यासाठी WhatsApp Web/ Desktop वर टॅप करा. इथे तुम्ही जिथून लॉगइन केलं ते सेशन दिसेल.
इथे असंही सेशन आहे, जे तुम्ही लॉगइन केलं नाही असं वाटत असेल, तर इतर कोणी ते वापरत असल्याची शक्यता असू शकते. तेथून अकाउंट लॉगआउट करा. इथे कोणत्या ब्राउजरमध्ये व्हॉट्सअॅप ओपन केलं आहे, ते दिसतं. लॉगआउट केल्याने, जिथे व्हॉट्सअॅप लॉगइन असेल, तिथून ते लॉगआउट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.