मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

डेटा चोरी टाळण्यासाठी Strong Password कसा निवडाल? जाणून घ्या टिप्स

डेटा चोरी टाळण्यासाठी Strong Password कसा निवडाल? जाणून घ्या टिप्स

पासवर्ड (Password) हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा घटक बनला आहे. फोन, ऑनलाईन पेमेंट, बँकिंग व्यवहार, ई-मेल आदी गोष्टींसाठी पासवर्ड ठेवावा लागतो. त्यामुळे किमान 12 ते 18 पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवावे लागतात.

पासवर्ड (Password) हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा घटक बनला आहे. फोन, ऑनलाईन पेमेंट, बँकिंग व्यवहार, ई-मेल आदी गोष्टींसाठी पासवर्ड ठेवावा लागतो. त्यामुळे किमान 12 ते 18 पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवावे लागतात.

पासवर्ड (Password) हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा घटक बनला आहे. फोन, ऑनलाईन पेमेंट, बँकिंग व्यवहार, ई-मेल आदी गोष्टींसाठी पासवर्ड ठेवावा लागतो. त्यामुळे किमान 12 ते 18 पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवावे लागतात.

मुंबई, 1 जुलै : पासवर्ड (Password) हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा घटक बनला आहे. फोन, ऑनलाईन पेमेंट, बँकिंग व्यवहार, ई-मेल आदी गोष्टींसाठी पासवर्ड ठेवावा लागतो. त्यामुळे किमान 12 ते 18 पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. तुम्ही नेमके किती पासवर्ड लक्षात ठेऊ शकता हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे पासवर्ड म्हणजे काय, तो कसा निवडावा, तो लक्षात कसा ठेवावा यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत. या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. पासवर्ड हा आता आपला दैनंदिन कामकाजातील महत्वपूर्ण घटक बनला आहे. ई-मेल (Email), बँकिंग (Banking) आदी गोष्टींचा वापर करण्यासाठी पासवर्ड हा आवश्यक ठरतो. खरं वाटणार नाही, पण तुम्हाला किमान 12 ते 18 पासवर्ड लक्षात ठेवावे लागतात. तुमच्या डोक्यात किती पासवर्ड सेव्ह आहेत, हे तुम्ही मोजू देखील शकणार नाही. त्यामुळे जाणून घेऊया पासवर्ड विषयी सर्व काही... पासवर्ड म्हणजे काय? तुमचा महत्वपूर्ण डेटा (Data) किंवा डिव्हाईसचे (Device) जो संरक्षण करतो, त्याला पासवर्ड म्हणतात. यापूर्वी हे पासवर्ड अंक किंवा अक्षरांच्या स्वरुपात असत. मात्र आता अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही पासवर्ड म्हणून डोळे, चेहरा किंवा बोटांचा उपयोग करु शकता. त्याचप्रमाणे पॅटर्न, फोटोज, पिन (Pin), बायोमेट्रीक अशा विविध पध्दती देखील पासवर्ड म्हणून ठेवता येणे आता शक्य आहे. आपण किती पासवर्ड लक्षात ठेऊ शकतो? खरं तर हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारु शकतो. इंटरनेट बॅंकिंग, ऑनलाईन बॅंकिंग, फोन, सोशल मिडीया अॅप्स, जीमेल (Gmail) आदींचा वापर करण्यासाठी पासवर्ड असतो आणि हे पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवणं क्रमप्राप्त असतं. परंतु, काही अॅप्स (Apps) किंवा प्लॅटफॉर्म असे असतात की त्यात एकदा लॉगइन केल्यानंतर आपण त्याचा पासवर्ड विसरुन जातो. पासवर्ड मॅनेजर नॉर्डपासने फेब्रुवारी 2020 मध्ये या अनुषंगाने सर्वेक्षण केले होते. त्यानुसार, एका सामान्य युजरकडे किमान 100 पासवर्ड असतात. एखाद्या अॅण्ड्राईड प्लॅटफॉर्मवर आपण एकदा लॉगिन केले तर पासवर्ड सेव्ह (Save) करण्याचा पर्याय त्यावर उपलब्ध असतो. यामुळे त्याचा पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज राहत नाही. मात्र उपयुक्त पासवर्ड तुम्ही एखाद्या वैयक्तिक डायरीत किंवा सुरक्षित जागी लिहून ठेऊ शकता. आपण सरासरी किती पासवर्ड वापरतो? तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश लोक आपल्या स्मार्टफोनमध्येच पासवर्डचा वापर करतात. फोन अनलॉक करणे किंवा काही आवश्यक अॅप्सच्या वापरासाठी दिवसभरात साधारण डझनभर पासवर्ड वापरले जातात. त्याचबरोबर जे युजर्स लॅपटॉपचा वापर करतात ते लॉग इन (Log In) करण्यासाठी पासवर्डचा वापर करतात. स्मार्टफोन आल्यामुळे पासवर्डची संख्या वाढली आहे. कारण फोनसह अॅप्स प्रोटेक्ट करण्यासाठी पासवर्ड हा उत्तम पर्याय असतो. जेव्हा लोक फिचर्स फोन्स वापरत तेव्हा फोन अनलॉक करण्यासाठी केवळ कि-पॅडचा वापर केला जात असे. त्यासोबतच फोनमधील फोटो गॅलरी, कॉन्टॅक्ट यासाठीही पासवर्डचा वापर व्हायचा. हे सर्व लक्षात घेता किमान 4 ते 5 पासवर्डमध्ये काम होऊन जात. सुरक्षित पासवर्डसाठी या बाबी लक्षात ठेवा - पासवर्डसाठी किमान 10 ते 15 अक्षरांचा वापर करा - यात अक्षरांसह अंकांचाही समावेश असावा - पासवर्डमध्ये एक अक्षर कॅपिटल असणं आवश्यक - तसेच स्पेशल कॅरॅक्टर्स जसे की (@,#,%,&,*) यांचा देखील वापर करावा. - सातत्याने पासवर्ड बदलत रहा. - जेथे शक्य आहे तिथे पासवर्ड ओटीपीने संरक्षित करा. पासवर्ड तयार करताना या चुका टाळा - सोप्या शब्दांचा पासवर्ड नसावा. - पासवर्ड हा 8 पेक्षा कमी अक्षरांचा नसावा. - पासवर्डमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख याचा वापर करु नका - युझर नेम हाच पासवर्ड नसावा - पासवर्ड कोणालाही विचारुन तयार करु नये कॉमन पासवर्डचा कसा वापर होतो एखाद्या प्लॅटफॉर्मचा वापर आपण कमी प्रमाणात करीत असलो तरी तिथे पासवर्डचा वापर करणं आवश्यक असते. अशा वेळी बहुतांश युजर कॉमन पासवर्डचा (Common Password) वापर करतात. हा पासवर्ड युजरचे नाव, जन्मतारखेमधील अंक यापासून तयार केलेला असतो. यात 123456, ABCD, ABC@123 किंवा Name@123 अशा पासवर्डचा समावेश असतो. याच बरोबर काही युजर्स आपल्या मुलांचे, पालकांचे नाव किंवा चित्रपटाच्या नावापासून पासवर्ड तयार करतात. अशा कॉमन पासवर्डमुळे डेटा चोरी होण्याचा धोका असतो. हॅकर्स असा पासवर्ड अगदी मिनिटभरात क्रॅक करु शकतात. त्यामुळे असा पासवर्ड ठेवणं धोक्याचं ठरु शकतं. आता होतोय पासफ्रेजचा वापर अनेक युजर्स आता आपला डेटा किंवा डिव्हाईस प्रोटेक्ट करण्यासाठी पासवर्ड ऐवजी पासफ्रेजचा (Pass Pharse) वापर करतात. हा पासवर्ड तयार करणं सोप पण क्रॅक करणं अवघड असतं. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी पासवर्ड तयार करणं आणि तो लक्षात ठेवणं देखील सोपं जातं. उदाहरणार्थ, समजा तुम्ही भोपाळला राहता. यातील I live in Bhopal या इंग्रजी वाक्यातील सुरुवातीचे शब्द घेतले तर Ilib असा शॉर्टफॉर्म तयार होतो. याला जीमेलसाठी g, फेसबुकसाठी f या अक्षरांची जोड द्यावी. तसेच लक्षात राहतील असे अंक देखील याला पुढे जोडावेत. यात तुम्ही तुमचे जन्मवर्ष देखील जोडू शकता. तेव्हा तुमचा जीमेल पासवर्ड Ilibg2015 असा होईल किंवा फेसबुक पासवर्ड Ilibf2015 असा होईल. यालाच पासफ्रेज म्हणतात. पासवर्ड कुठे वापरला जातो याचं पहिलं उत्तर आहे स्मार्टफोन. भलेही फोनमध्ये वैयक्तिक डेटा नसेल परंतु, फोनला पासवर्ड मात्र असतो. तसेच जीमेल अकाऊंट, सोशल मिडीया अप्स, अन्य अप्स, फोन मधील गॅलरी साठी पासवर्ड वापरला जातो. त्याचप्रमाणे बॅकींग, युपीआय, रेल्वे बुकींग, गॅस बुकींग, एलआयसी,डिजी लॉकर, उमंग, ओटीटी अॅप्स साठी देखील पासवर्डचा वापर होतो.
First published:

Tags: Mobile, Online security, Password, Personal banking

पुढील बातम्या