मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

iPhone घेण्याचा विचार आहे? इथे मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा Discount, पाहा काय आहे ऑफर

iPhone घेण्याचा विचार आहे? इथे मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा Discount, पाहा काय आहे ऑफर

या जबरदस्त ऑफरमध्ये अ‍ॅपल प्रोडक्ट्सची (Apple Products) खरेदी करायची असल्यास, विजय सेल्सच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्टोरवर जावं लागेल.

या जबरदस्त ऑफरमध्ये अ‍ॅपल प्रोडक्ट्सची (Apple Products) खरेदी करायची असल्यास, विजय सेल्सच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्टोरवर जावं लागेल.

या जबरदस्त ऑफरमध्ये अ‍ॅपल प्रोडक्ट्सची (Apple Products) खरेदी करायची असल्यास, विजय सेल्सच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्टोरवर जावं लागेल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : आयफोन (iPhone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. विजय सेल्समध्ये (Vijay Sales) आयफोन 12 सीरिज (iPhone 12 Series), आयफोन 11 (iPhone 11) आणि आयफोन एक्सआरवर (iPhone XR) जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. केवळ आयफोनच नाही नाही, तर रिटेलर आयपॅड मॉडेल (iPad), मॅकबुक (MacBooks), अ‍ॅपल वॉच मॉडेल (Apple Watch), एअरपॉड्स मॉडेल (AirPods) आणि होमपॉड्सवरही (HomePods) बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे.

विजय सेल्सच्या या जबरदस्त ऑफरमध्ये अ‍ॅपल प्रोडक्ट्सची (Apple Products) खरेदी करायची असल्यास, विजय सेल्सच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्टोरवर जावं लागेल.

विजय सेल्सच्या अ‍ॅपल डेज सेलमध्ये (Vijay Sales Apple Days sale) HDFC बँक कार्डचा वापर केल्यास सूट दिली जात आहे. क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास 7000 रुपयांपर्यंतची सूट आहे. ही सूट मॅकबुक प्रो वर देण्यात येत आहे. याची किंमत 1,14,000 रुपये आहे. डिस्काउंटनंतर मॅकबुक प्रो 1,07,000 रुपयांत खरेदी करता येईल.

मॅकबुक प्रो आणि मॅकबुक एअर दोघांवर अ‍ॅपल केअर + खरेदीवर 15 टक्क्यांची सूट आहे. अ‍ॅपल डेज सेल आता लाईव्ह असून 9 ऑगस्टपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे.

VIDEO:एक-दोन नाही, तर तब्बल 100 चार्जरने चार्ज केला iPhone,पुढे नेमकं काय झालं..

iPhone 12 ऑफर्स -

iPhone 12 64GB फोन 73,400 रुपयांत खरेदी करता येईल. परंतु HDFC बँक कार्डचा वापर करुन हा फोन खरेदी केल्यास, 6 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. म्हणजेच iPhone 12 फोन 67,400 रुपयांत खरेदी करता येईल. iPhone 12 नुकताच Amazon Prime Day सेलमध्ये 67,999 रुपयांत उपलब्ध होता.

OMG! चिनी कंपनी OnePlus Nord 2 चा स्फोट; खरेदीच्या पाचव्याच दिवशी घडला हा प्रकार

विजय सेल्स अ‍ॅपल डेजमध्ये इतरही iPhone वर ऑफर देण्यात आली आहे. iPhone 12 मिनी 6 हजार रुपयांच्या कॅशबॅकसह 57,499 रुपयांत मिळतो आहे. iPhone 12 प्रो फोन 5 हजारांच्या सूटसह 1,04,900 रुपयांत आहे. तर iPhone 12 प्रो मॅक्स 5 हजारांच्या डिस्काउंटसह 1,14,999 रुपयांत मिळतो आहे.

First published:

Tags: Apple, Iphone, Smartphone, Tech news