मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

OMG! चिनी कंपनी OnePlus Nord 2 चा स्फोट; खरेदीच्या पाचव्याच दिवशी घडला हा प्रकार

OMG! चिनी कंपनी OnePlus Nord 2 चा स्फोट; खरेदीच्या पाचव्याच दिवशी घडला हा प्रकार

तरुणी सायकल चालवताना हा स्फोट झाला आणि त्यामुळे तिचा अपघात झाल्याचंही समोर आलं आहे.

तरुणी सायकल चालवताना हा स्फोट झाला आणि त्यामुळे तिचा अपघात झाल्याचंही समोर आलं आहे.

तरुणी सायकल चालवताना हा स्फोट झाला आणि त्यामुळे तिचा अपघात झाल्याचंही समोर आलं आहे.

बंगळुरू, 2 ऑगस्ट : स्मार्टफोन (Smartphone) हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचं साधन बनला आहे. बाजारात दररोज म्हटलं तरी नवनवीन फोन लाँच (Launch) होत असतात. नवीन फिचर्स (Features) दिसले की आपला जुना फोन बदलून नवीन फोन घ्यायची बऱ्याच लोकांना जणू काही सवयचं जडली असल्याचं आपल्याला दिसतं. आपल्या आजूबाजूला सुद्धा असे लोक असतील. चिनी स्मार्टफोन कंपनी वनप्लसने नुकताच वनप्लस नॉर्ड 2 (OnePlus Nord 2) हा फोन लाँच केला आहे. एका व्यक्तीने नुकताच हा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर खरेदी केला. मात्र त्याची पत्नी हा फोन घेऊन सायकलिंग करायला गेली असताना अचानक या फोनचा स्फोट (Blast) झाला. याबाबतचं वृत्त आजतकने दिलं आहे.

बंगळुरूच्या अंकुर शर्मा नावाच्या व्यक्तींनं ट्विट (Tweet) करून याबाबतची माहिती दिली. त्याच्या पत्नीसोबत ही घटना घडली आहे. त्यानं OnePlus Nord 2 चे फोटो मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर (Micro Blogging Website) पोस्ट केले होते. मात्र, नंतर या युजरने ट्विट डिलिट केलं आहे. यामध्ये OnePlus Nord 2 पूर्णपणे जळालेला दिसत होता. तुम्ही हे फोटो काळजीपूर्वक पाहिले तर दिसून येतं की OnePlus Nord 2 च्या स्फोटाची तीव्रता जास्त मोठी होती.

OnePlus Nord 2 खरेदी केल्यानंतर त्याच्यासोबत पाच दिवसांमध्येच अशा प्रकारची घटना घडली आहे. त्यानं हा फोन त्याच्या पत्नीसाठी खरेदी केला होता. त्याची पत्नी सायकलिंगला (Cycling) गेली असताना फोन तिच्या जवळचं होता. त्यावेळीच OnePlus Nord 2 स्मार्टफोनचा स्फोट झाला. अंकुरने म्हटलंय की OnePlus Nord 2 चा अचानक स्फोट झाला आणि धूर निघू लागला. या स्फोटामुळे माझ्या पत्नीचा अपघात झाला असून तिच्या मनावर सुद्धा मोठा आघात (trauma) झाला आहे.

हे ही वाचा-Alert! 27 सप्टेंबरपासून या स्मार्टफोनमध्ये नाही चालणार Gmail, YouTube आणि Google

वनप्लस कंपनीने (Oneplus) या घटनेची दखल घेतली असून याबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसंच युजरला पूर्ण मदतीचं आश्वासन सुद्धा दिलं आहे. अद्याप स्फोट कशामुळे झाला याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. वनप्लसने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कंपनीला अंकुरसोबत घडलेल्या घटनेबद्दल खेद वाटतो. कंपनीला त्याची काळजी आहे. OnePlus Nord 2 चे अंकुरने ट्विट केलेले फोटो आता ट्विटरवर व्हायरल झाले आहेत. वेगवेगळे लोक स्फोट होण्यासाठी वेगवेगळी कारणं घडली असावीत असं आपलं मत व्यक्त करत आहेत.

OnePlus Nord 2 च्या स्फोटाची ही पहिलीच घटना समोर आली आहे. यामुळे फोनमध्ये समस्या आहे की नाही हे लगेच सांगता येणार नाही. कारण हा फोन नुकताच लाँच झाला आहे. त्यामुळे फोनचा स्फोट होण्यामागील नेमकं कारण हे येणाऱ्या काळातचं स्पष्ट होईल. मात्र या घटनेनंतर लोकं हा फोन खरेदी करताना नक्कीच विचार करतील.

First published:

Tags: Mobile, Mobile Phone