• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • एक-दोन नाही, तर तब्बल 100 चार्जरने चार्ज केला iPhone, पुढे नेमकं काय झालं...पाहा VIDEO

एक-दोन नाही, तर तब्बल 100 चार्जरने चार्ज केला iPhone, पुढे नेमकं काय झालं...पाहा VIDEO

आयफोन एक-दोन नाही, तर तब्बल 100 चार्जरने चार्ज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आयफोनवरील एक्सपेरिमेंटचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : सध्या स्मार्टफोनचा (Smartphone) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात स्मार्टफोनमध्ये अनेकांना महागड्या आयफोनची (iPhone) मोठी क्रेझ असते. अनेकांनी या फोनचा केवळ वापरच केला नाही, तर त्यावर अनेक एक्सपेरिमेंटही केल्याचं समोर आलं आहे. या फोनचा टिकाऊपणा, मजबूती समजण्यासाठीही असे प्रकार केले जातात. असाच आयफोनवरील एक्सपेरिमेंटचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. एका यूट्यूबरने आपला आयफोन एक-दोन नाही, तर तब्बल 100 चार्जरने चार्ज करण्याचा प्रयत्न केला. 100 चार्जरचा वापर करुन आयफोन किती वेळात चार्ज होऊ शकतो असं एक्सपेरिमेंट केलेला व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. iPhone 6S लवकरात लवकर चार्ज करण्यासाठी एका यूट्यूबरने भन्नाट ट्रिक वापरली. त्याने फोन चार्ज करण्यासाठी 100 चार्जरचा वापर केला. इतक्या चार्जरचा वापर करुन आयफोन किती लवकर चार्ज होतो, हे त्याला पाहायचं होतं. एकावेळी त्याने दोन iPhone 6S चा या एक्सपेरिमेंटसाठी वापर केला. एका iPhone 6S ला सिंगल चार्जरसह जोडलं. तर एक फोन 100 चार्जरच्या एका पीनला जोडला. दोन्ही फोनची बॅटरी पूर्णपणे संपलेली होती.

  तुमच्याकडे Contactless क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आहे का? अशी बाळगा सावधगिरी

  100 चार्जरचा वापर करुन चार्ज केलेला फोन अतिशय लवकर चार्ज होईल असं वाटू शकतं. परंतु असं झालं नाही. 100 चार्जरने फोन लवकर तर चार्ज झाला, पण सिंगल चार्जरवाला फोनही मागे नव्हता. 100 चार्जरवाला फोन 15 मिनिटांत 100 टक्के चार्ज झाला. तर सिंगल चार्जरवाला फोन 20 मिनिटांत चार्ज झाला.

  Mobile Phone चोरी झाल्यास आता सरकारच करणार मदत, करावं लागेल हे एक काम

  हा व्हिडीओ आतापर्यंत 3 कोटीहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे. एक्सपेरिमेंट यूट्यूबर TechRax ने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
  Published by:Karishma
  First published: