नवी दिल्ली, 15 एप्रिल: इन्स्टाग्राम अधिकृतरित्या एक नवं फीचर आणणार आहे. ज्यात युजर्स आपल्या पोस्टवरील लाईक काउंट लपवू शकतात. सध्या या फीचवर टेस्टिंग सुरू आहे. गेल्यावेळीही हे फीचर लाईव्ह करण्यात आलं होतं. मात्र एक बग आल्यामुळे यावर रोख लावण्यात आली होती. आता या फीचरच्या टेस्टिंगदरम्यान इन्स्टाग्राम युजर्सला दोन पर्यात देत आहे. एक, आपल्या पोस्टवरील लाईक लपवण्याचा आणि दुसरा, दुसऱ्याच्या पोस्टवरील लाईक पाहू इच्छितात की नाही, हे ठरवण्याचा पर्याय आहे. तसंच फेसबुकही लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर या फीचरचं टेस्टिंग सुरू करणार आहे.
इन्स्टाग्रामचे सीईओ एडम मोसेरी यांनी ट्विटरवर काउंट अपडेटची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी आम्ही काही लोकांसाठी हे काउंट हाईड फीचर सुरू केलं होतं. या फीचरमुळे इन्स्टाग्राम पोस्ट करताना युजर्सचा काउंटबाबतचा दबाव कमी होतो का, हे पाहण्यासाठी काही लोकांसाठी हे सुरू केलं होतं. काही लोकांना हे फायदेशीर वाटलं, तर काही लोकांनी पोस्टवरील लाईक काउंट दिसावा असं म्हटलं, असल्याचं मोसेरी यांनी सांगितलं.
त्यानुसार आम्ही एका नव्या पर्यायावर टेस्टिंग करत आहोत, ज्यात युजरचं ठरवेल की, लाईक काउंट फीचर ऑन ठेवायचं की नाही.
या फीचरची सुरुवात इन्स्टाग्रामवर केली जात आहे. परंतु लवकरच फेसबुकही अशाप्रकारचं फीचर आणू शकतं. फेसबुक यासाठीचं टेस्टिंग काही दिवसांत सुरू करणार आहे, अशी माहितीही मोसेरी यांनी दिली.
याआधी मार्चमध्ये इन्स्टाग्रामने काही लोकांसाठी लाईक काउंट लपवण्याच्या या फीचरचं टेस्टिंग सुरू केलं होतं. परंतु एका बगने कंपन्याच्या प्लॅनिंगच्या विरुद्ध अधिक लोकांना या टेस्टिंगमध्ये जोडलं. हा बग जगभरातील अनेक युजर्सच्या अकाउंटवर आढळला होता. त्यानंतर हे टेस्टिंग थांबण्यात आलं होतं.
दरम्यान, इन्स्टाग्राम युजर्सनी, या प्लॅटफॉर्मवर जो कंटेंट शेअर केला जातो, त्या कंटेंटवर फोकस करावा, पोस्टवर किती लाईक्स येतात किंवा नाही अशा लाईक्स काउंटवर फोकस करू नये असं कंपनीने म्हटलं आहे. अनेक जण आपल्या पोस्टवर कमी लाईक्स आले म्हणून तणावात असल्याचं समोर आलं आहे, हीच बाब टाळण्यासाठी आता इन्स्टाग्रामकडून हे महत्त्वपूर्ण फीचर लाँच केलं जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.