नवी दिल्ली, 15 एप्रिल: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं गंभीर स्वरुप समोर आलं आहे. देशात दिवसाला 1 लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, देशातील अनेक राज्यांनी आपापल्या राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जण संक्रमित झाले असून राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. कोरोना काळात राज्यात संचारबंदी असताना अनेक जण शॉपिंगसाठी ऑनलाईनचा साईट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. ऑनलाईन पेमेंट तसंच कोणाच्याही संपर्कात येण्याची भीती कमी असल्याने अनेक जण घसबसल्या हव्या त्या वस्तू ऑनलाईन शॉपिंगद्वारेच घेण्याला प्राधान्य देत आहेत. तसंच ऑफर्स, आकर्षक डिस्काउंट हे देखील ऑनलाईन शॉपिंगचं प्रमुख कारण ठरतं. परंतु घसबसल्या अशा शॉपिंगवेळीही काही गोष्टींची खबरदारी बाळगणं, काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. सुरक्षित वेबसाईट्स - डिस्काउंट किंवा केवळ आकर्षक जाहिरात पाहून कोणत्याही माहित नसलेल्या वेबसाईटवरुन खरेदी करू नका. असं करणं ऑनलाईन फ्रॉडचं कारणं ठरू शकतं. चांगल्या अर्थात प्रसिद्ध, क्रेडिशियल वेबसाईट्सवरुन खरेदी करा. प्रोडक्ट रिव्ह्यू - कोणतीही वस्तू किंवा सामान खरेदी करताना त्याचे रिव्ह्यू नक्की वाचा. यामुळे केवळ प्रोडक्टविषयीच माहिती मिळणार नाही, तर याच्या मर्चेटबाबतही रिव्ह्यू मिळतील. रिव्ह्यू योग्य वाटले नाहीत, तर त्या साईटवरुन वस्तू खरेदी करण्याची रिस्क अजिबात घेऊ नका. (वाचा - भारतीय मोबाईल युजरच्या फोनला मालवेअर अटॅकचा धोका; हा Malware कसा ओळखाल? ) एक्सपायरी डेट - ऑनलाईन शॉपिंगमध्ये सर्वाधिक महत्त्वाची बाब सामानाच्या एक्सपायरी डेटबाबत असते. एक्सपायर झालेल्या सामानाची डिलिव्हरी होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे वस्तू किंवा खाण्याचं सामान मागवताना त्याची एक्सपायरी डेट पाहणं अतिशय गरजेचं आहे. जर प्रोडक्टच्या समोर एक्सपायरी डेट लिहिली नसेल, तर ती वस्तू, सामान घेण्याचा धोका पत्करू नका. ऑफर्स - एकावर सहा कॉम्बो फ्री, एका खरेदीवर सात वस्तू फ्री अशा प्रकारच्या कोणत्याही ऑफर्सच्या जाळ्यात अडकू नका. जर प्रोडक्ट क्वालिटी अतिशय चांगली असेल, तर कंपन्या अशा ऑफर कधीही देत नाही. कंपनी एखाद्या कॉम्बोवर डिस्काउंट देऊ शकते. परंतु अशा अशक्य वाटणाऱ्या ऑफर्स देणार नाही. त्यामुळे ऑफर्समध्ये खरेदी करताना विशेष लक्ष द्या.
(वाचा - UIDAI ने सांगितला Aadhaar सुरक्षित ठेवण्याचा नवा पर्याय; असा लॉक करा आधार नंबर )
टर्म्स अँड कंडिशन - एखाद्या प्रोडक्टच्या रिटर्नपासून ते डिलिव्हरीपर्यंत संपूर्ण टर्म्स अँड कंडिशन अतिशय सावधपणे वाचा. कारण सामान एखाद्या सेकंड पर्सन किंवा थर्ड सोर्सकडून येत असतं. जर सामान योग्यरित्या डिलिव्हर झालं नाही किंवा चुकीचं डिलिव्हर झालं, तर अशा दोन्ही स्थितीत तुम्हाला एखाद्या वेबसाईटच्या पॉलिसी, टर्म्स अँड कंडिशन माहित असणं गरजेचं आहे.

)







