नवी दिल्ली, 15 एप्रिल : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) लवकरच डेटिंग अॅप (Dating App) लाँच करणार आहे. या अॅपवर युजर्स एखाद्याला पसंत करुन, त्याला डेट करू शकतात. या अॅपचं नाव स्पार्क्ड (Sparked) असं आहे. सध्या हे अॅप टेस्टिंग फेजमध्ये आहेत. फेसबुकचा दावा आहे, की हे नवं अॅप इतर सर्व डेटिंग अॅप्सहून वेगळं असणार आहे. हे अॅप अॅक्सेस करणंही अधिक चॅलेजिंग असणार आहे. 4 मिनिटांची असणार एक व्हिडीओ डेट - कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्पार्क्ड अॅप युजर्ससाठी फ्रीमध्ये असणार आहे. युजर्स हे अॅप फेसबुक अकाउंटसोबत लॉगइन करू शकतात. Sparked App मध्ये युजर्ससाठी एक व्हिडीओ स्पीड डेटिंग ऑफर केली जाईल.
(वाचा - Facebook च्या आक्षेपार्ह पोस्टमुळे समस्या येतेय? आता बिनधास्त करा Complaint )
Verge रिपोर्टनुसार, या अॅपमध्ये पहिली व्हिडीओ डेट 4 मिनिटांची असणार आहे. त्यात व्हिडीओमध्ये युजरला स्वत:बद्दल माहिती द्यावी लागेल. हा व्हिडीओ दुसऱ्या युजर्सला दाखवला जाईल. जर समोरच्या युजरला तुमचा व्हिडीओ आवडला तर त्याच्यासोबत डेटिंगची संधी मिळेल. पहिल्या डेटनंतर, जर दोन्ही युजर्स पुन्हा व्हिडीओ डेटवर आल्यास, दुसरी व्हिडीओ डेट 10 मिनिटांची असेल. एकदा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर फेसबुक टीम याची तपासणी करेल. त्यानंतरच युजरला या डेटिंग अॅपमध्ये एन्ट्री मिळेल.
(वाचा - Lockdownमुळे पुन्हा ऑनलाईन शॉपिंगला पसंती, या गोष्टी लक्षात घेणं ठरेल फायद्याचं )
फेसबुकच्या या डेटिंग अॅपमध्ये एन्ट्री घेण्यासाठी आधी चार मिनिटांचा व्हिडीओ बनवावा लागेल. यात स्वत: बद्दल माहिती द्यावी लागेल. तसंच तुम्हाला कोणाला डेट करायचं आहे, हेदेखील सांगावं लागेल. रिपोर्टनुसार, या डेटिंग अॅपद्वारे लोक एकमेकांच्या संपर्कात येतील. डेटिंगवर मॅच मिळाल्यानंतर युजरकडे इन्स्टाग्राम किंवा ईमेलद्वारे बातचीतची संधी आहे. दरम्यान, फेसबुकने अमेरिका आणि युरोपमध्ये एक खास डेटिंग अॅप फेसबुक डेटिंग नावाने लाँच केलं होतं.

)







