नवी दिल्ली, 11 मार्च: सध्याच्या युगात, व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब (YouTube) हा केवळ कमाई करण्याचा एक चांगला मार्ग नाही तर याने लोकांना त्यांची प्रतिभा दर्शविण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ सुद्धा उपलब्ध करून दिल आहे. याने यूट्यूबर्सला पैसे सुद्धा कमवता येत होते. परंतु आता अमेरिकेबाहेरील YouTubers कमी पैसे कमवतील. वास्तविक, आतापर्यंत जे लोक यूट्यूबवर व्हिडिओ तयार करतात त्यांना कर भरावा लागत नाही परंतु लवकरच त्यांना कर भरावा लागणार आहे. गूगल ने भारतीय यूट्यूबर्सला एक मेल पाठवून तशी चेतावणी दिली आहे. यामध्ये कंपनीने हे स्पष्ट केले आहे की 31 मेनंतर यूट्यूबच्या कमाईवर कर (Tax) आकारला जाईल. अमेरिकन क्रिएटर्सना नाही द्यावा लागणार कोणताचं कर: यात दिलासा देणारी गोष्ट अशी आहे की, तुम्हाला केवळ त्याचं व्यूजसाठी (YouTube Views) कर भरावा लागणार आहे जे तुम्हाला अमेरिकी दर्शकांकडून मिळाले आहेत. तसेच, अमेरिकन क्रिएटर्सना कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा अर्थ असा की जर एखाद्या भारतीय यूट्यूबरचा व्हिडीओ कोणी अमेरिकेमध्ये पाहात असेल तर त्या व्यूज मधून मिळणाऱ्या कमाईवर तुम्हाला कर भरावा लागणार आहे.
कधीपासून सुरु होणार ही यूट्यूबची नवी टॅक्स पॉलिसी? गूगलच्या (Google) मालकीची यूट्यूबची ही नवी टॅक्स पॉलिसी (Youtube tax Policy) जून 2021 पासून लागू करण्यात येणार आहे. आपल्या अधिकृत संप्रेषणात Google ने व्हिडिओ निर्मात्यांना त्यांच्या अॅडसेन्स खात्यावर कर माहिती भरण्यास सांगितलं आहे.
हे पहा - मॅकेनिकचा ‘कार’नामा; कोणतीही पदवी न घेता बनवली पाण्यावर चालणारी Car, हा VIDEO एकदा पाहाच
जर तुम्ही 31 मार्च 2021 पर्यंत तुमची टॅक्स संबंधीत माहिती दिली नाहीत तर कंपनी तुमच्या एकूण कमाईच्या 24 टक्के रक्कम कपात करेल. भारताच्या बाबतीत तुम्ही जर करविषयक माहिती दिली तर अमेरिकन प्रेक्षकांकडून आलेल्या व्यूजनुसार तुमचा कर 15 टक्क्यांनी कमी होईल.