जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Smartphone चोरी झाल्यास मोठ्या नुकसानाची शक्यता; टाळण्यासाठी ही 5 कामं कराच

Smartphone चोरी झाल्यास मोठ्या नुकसानाची शक्यता; टाळण्यासाठी ही 5 कामं कराच

Smartphone चोरी झाल्यास मोठ्या नुकसानाची शक्यता; टाळण्यासाठी ही 5 कामं कराच

मोबाईल हरवला, तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात फोन चुकीच्या हातात गेल्यास, अधिकच समस्या निर्माण होऊ शकते. अशात काही गोष्टी लक्षात ठेवणं फायद्याचं ठरेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 4 जुलै : सध्या मोबाईल फोन प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. अशात मोबाईल हरवला, तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात फोन चुकीच्या हातात गेल्यास, अधिकच समस्या निर्माण होऊ शकते. अशात काही गोष्टी लक्षात ठेवणं फायद्याचं ठरेल. ज्यामुळे तुम्ही या समस्यांपासून वाचू शकता. फोन चोरी झाल्यानंतर करा हे महत्त्वपूर्ण काम - - फोन चोरी झाल्यानंतर सर्वात आधी तुमचं सिम ब्लॉक करा. तुमच्या टेलिकॉम सर्विस प्रोव्हाईडरला कॉल करा आणि तुमचं हरवलेलं सिम ब्लॉक करा. सिम ब्लॉक केल्यानंतर कोणाताही OTP चोरापर्यंत पोहोचणार नाही. - फोन चोरी झाल्यानंतर आधार कार्ड एखाद्या दुसऱ्या नंबरशी लिंक करा. यासाठी जवळच्या आधार केंद्रावर जाऊन दुसऱ्या नंबरशी ते लिंक करू शकता. - फोनमध्ये आधार कार्ड डिटेल्स असल्यास, ते चोरी केलेल्या व्यक्तीच्या हातात पोहोचू नये. तुमच्या आधार कार्डचा चोराकडून गैरवापर केला जाऊ शकतो.

(वाचा -  फोनचा नेटवर्क Issue?; चिंता नको… मग ही बातमी खास तुमच्यासाठी )

- तसंच सर्व UPI आयडी आणि इतर पेमेंट्स अ‍ॅप वॉलेट डिअ‍ॅक्टिव्हेट करणं आवश्यक आहे. - ईमेल आयडी, सर्व सोशल मीडिया अकाउंट्स जे तुमच्या फोन नंबरशी लिंक आहेत, ते सर्व डिअॅक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. यामुळे चोर तुमचं कोणतंही सोशल मीडिया आयडी वापरु शकणार नाही, तसंच त्याचा चुकीचा वापरही करू शकणार नाही. - सर्वात आधी Find My Device वेबसाईटवर जावं लागेल, हे गुगलवर सर्च करुन मिळेल. - इथे त्याच गुगल अकाउंटवरुन लॉगइन करा, जे स्मार्टफोनमध्ये अ‍ॅक्टिव्ह आहे.

(वाचा -  नवीन Smartphone घेताय? 15 हजार रुपयांत जबरदस्त फीचर्ससह मिळतील हे 5G फोन )

- लॉगइन केल्यानंतर वेबसाईट तुमचा फोन सर्च करण्यास सुरु करेल. - वेबसाईटद्वारे गुगल मॅपवर आपल्या फोनचं शेवटचं लोकेशनही पाहता येईल. तसंच लोकेशनचं डायरेक्शनही पाहता येईल. ते फॉलो करत फोनपर्यंत पोहोचता येऊ शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात