Home /News /technology /

मोबाईलला नेटवर्क नसतानाही करता येईल कॉल, जाणून घ्या वाय-फाय कॉलिंगची प्रोसेस

मोबाईलला नेटवर्क नसतानाही करता येईल कॉल, जाणून घ्या वाय-फाय कॉलिंगची प्रोसेस

wifi Calling: अनेकदा काही तांत्रिक कारणांमुळे नेटवर्क (Network) विस्कळीत झाल्यास युजरला कॉलिंगसाठी अडचणी निर्माण होतात.

नवी दिल्ली, 03 जुलै: स्मार्टफोन (Smartphone) ही आता दैनंदिन जीवनातील महत्वाची गरज बनली आहे. आजच्या डिजीटल युगात सर्वच कामे स्मार्टफोनच्या आधारे केली जात आहेत. मात्र अनेकदा काही तांत्रिक कारणांमुळे नेटवर्क (Network) विस्कळीत झाल्यास युजरला कॉलिंगसाठी अडचणी निर्माण होतात. अशा वेळी काय करावे, हा प्रश्न प्रत्येक युजरच्या मनात येतो. मात्र अशी एक सुविधा आहे की जी नेटवर्क नसतानाही तुम्हाला कॉलिंगसाठी सहायक ठरते. जाणून घेऊया या सुविधेविषयी... अनेक टेलिकॉम ऑपरेटर्स (Telecom Operators) आपल्या युजरला वाय-फाय कॉलिंग (Wi-Fi Calling) सुविधा देतात. या सुविधेच्या मदतीने तुम्ही नेटवर्क नसतानाही कॉलिंग करु शकता. अॅण्ड्राईड (Android) आणि आयओएस (iOS) ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या अनेक फोनमध्ये हे फिचर इनबिल्ट (Inbuilt) असते. मात्र हे फिचर अॅक्टिव्हेट करणं आवश्यक असतं. अॅण्ड्राईड फोनवरुन असे करा वाय-फाय कॉलिंग यासाठी अॅण्ड्रॉईड युजरला सर्वप्रथम सेटिंगमध्ये जाऊन नेटवर्क, इंटरनेट आणि वाय-फाय कॉलिंग तपासवे लागेल. यासाठी युजरला टेलिकॉम ऑपरेटरने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. यानंतर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरुन वाय-फाय कॉलिंग करु शकता. हेही वाचा-  WhatsApp वर Video पाठवणाऱ्यांसाठी खूशखबर! तुमच्यासाठी खास येतंय हे फीचर आयफोन (iPhone) युजर्स असे करु शकतात वाय-फाय कॉलिंग यासाठी आयफोन युजर्सला सर्वप्रथम सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर चेक वाय-फाय कॉलिंग या पर्यायावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर वाय-फाय कॉलिंग ऑन करावे लागेल. त्यानंतर बॅक बटण दाबून पुन्हा मागील स्क्रिनवर यावे लागेल. येथे आल्यावर तुम्हाला अदर डिव्हाईसवर (Device) क्लिक करावे लागेल. यानंतर दुसऱ्या फोनसाठी हे फिचर ऑन (On) करावे लागेल. या कंपन्या देतात वाय-फाय कॉलिंगची सुविधा झी न्यूज हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या एअरटेल (AirTel), जिओ (Jio) आणि व्होडाफोन आयडिया (Vodafone-Idea) या टेलिकॉम कंपन्या आपल्या युजर्सला फ्री वाय-फाय कॉलिंग सुविधा देत आहेत. यासाठी तुम्हाला कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही. मात्र बीएसएनएल युजर्सला वाय-फाय कॉलिंगसाठी विंग्ज ॲप डाऊनलोड करावे लागेल आणि या सुविधेसाठी 1099 रुपये रजिस्ट्रेशन शुल्क भरावे लागेल. हेही वाचा-  Jio ची भन्नाट सेवा, पेमेंट न करता 5 वेळा करता येईल रिचार्ज, वाचा Emergency Data loan बाबत या गोष्टींची घ्या काळजी हे फिचर एनेबल झाल्यानंतर युजर आपल्या स्मार्टफोनवरुन नेटवर्क उपलब्ध नसतानाही कॉल करु शकतात. मात्र यासाठी तुम्हाला वाय-फायशी कनेक्ट राहावे लागते. त्याचबरोबर आपला नेटवर्क प्रोव्हायडर (Network Provider) वाय-फाय सपोर्ट देतो की नाही हे युजरने तपासणे गरजेचे आहे. याबाबतची माहिती युजर संबंधित टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केअर प्रतिनिधीला कॉल करुन देखील मिळवू शकतात.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Mobile

पुढील बातम्या