Home /News /technology /

नवीन Smartphone घेताय? 15 हजार रुपयांत जबरदस्त फीचर्ससह मिळतील हे 5G फोन

नवीन Smartphone घेताय? 15 हजार रुपयांत जबरदस्त फीचर्ससह मिळतील हे 5G फोन

तुम्हीही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर कमी बजेटमध्येही 5G सपोर्ट करणारे फोन्स तुम्हाला मिळून शकतील. 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळणारे 5G Smartphone -

नवी दिल्ली, 1 जुलै: देशात मोठ्या प्रमाणात तांत्रिक प्रगती होताना दिसून येत आहे. दूरसंचार क्षेत्रामध्ये 4G नंतर आता 5G ही देशात येण्याच्या तयारीत आहे. यामुळे इंटरनेटचा वेग वाढण्यासोबतच इतरही फायदे आपल्याला मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून 5G ची प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे, आता काही दिवसांमध्येच देशात हे तंत्रज्ञान लॉंच होण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेऊन कित्येक मोबाईल कंपन्यांनी आधीपासूनच 5G ला सपोर्ट करणारे स्मार्टफोन बाजारात लॉंच करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला महाग असणारे 5G फोन्स आता मध्यमवर्गीयांनाही परवडतील अशा किंमतीमध्ये उपलब्ध झाले आहेत. तुम्हीही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर कमी बजेटमध्येही 5G सपोर्ट करणारे फोन्स तुम्हाला मिळून शकतील. 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळणारे 5G Smartphone - Realme 8 5G - या स्मार्टफोनची किंमत सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी आहे. या फोनची किंमत 13,999 रुपये असून ग्राहकांना या किमतीत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला रिअलमी 8 हा फोन मिळेल. हा फोन सध्या सुपरसोनिक ब्लॅक आणि सुपरसोनिक ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये अँड्रॉईड 11 बेस्ड Realme UI 2.0, 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंची फुल-HD+ (1,080x2,400 पिक्सल) डिस्प्ले, MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, 16MP सेल्फी कॅमरा आणि 5,000mAh चा बॅटरी बॅकअप मिळणार आहे.

(वाचा - ऑनलाईन पॉर्न पाहता? Google, FB ची तुमच्यावर नजर, असा ट्रॅक होतो तुमचा डेटा)

Poco M3 Pro 5G - पोकोच्या या फोनची किंमत देखील रिअलमी इतकीच आहे. 13,999 रुपये किंमत असलेल्या या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. हा फोन कूल ब्लू, पॉवर ब्लॅक आणि पोको येलो कलरमध्ये उपलब्ध आहे. यात अँड्रॉईड 11 बेस्ड MIUI 12, 90Hz रिफ्रेश रेटससह 6.5-इंची फुल-HD+ होल पंच डिस्प्ले, MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, Mali-G57 GPU, 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, 8MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

(वाचा - Smile Please! या ऑफिसमध्ये हसल्यानंतरच मिळणार एन्ट्री)

Oppo A53s 5G - या स्मार्टफोनची किंमत आधीच्या दोन फोनपेक्षा जास्त आहे. सोबतच रॅम आणि स्टोरेज देखील जास्त आहे. 14,990 रुपये किंमत असलेल्या या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आलंय. हा फोन क्रिस्टल ब्लू आणि इंक ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये अँड्रॉईड 11 बेस्ड ColorOS 11.1, 6.52-इंची HD+ (720x1,600 पिक्सल) डिस्प्ले, MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 13MP प्रायमरी कॅमेरा, 8MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही जर फोन घेण्याच्या विचारात असाल तर नक्कीच 5G फोन निवड करू शकता. 5G च्या वापरास सरकाने परवानगी दिल्यानंतर तुम्हाला नवीन फोन घेण्याची गरज पडणार नाही.
First published:

Tags: Oppo smartphone, Smartphone, Tech news, Technology

पुढील बातम्या