मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या कामाची बातमी! मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच, अन्यथा होईल मोठं नुकसान

तुमच्या कामाची बातमी! मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच, अन्यथा होईल मोठं नुकसान

पावसाळ्यामध्ये डोळ्यांचे विकार वेगाने वाढतात.

पावसाळ्यामध्ये डोळ्यांचे विकार वेगाने वाढतात.

अतिरिक्त लॅपटॉप, मोबाईलचा वापर करणं आपल्या डोळ्यांना थकवत आहे. केवळ थकवतच नाही, तर डोळ्यांतील पाणीही कमी करत आहे.

नवी दिल्ली, 22 जून: मोबाईल, लॅपटॉप आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये तर लॅपटॉप, स्मार्टफोन वापरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अनेक जण वर्क फ्रॉर्म होम असल्याने, तसंच मुलांच्या शाळाही ऑनलाईन असल्याने मोठे-लहान सर्वच जण याचा वापर करतात. अनेक जण गेमिंग, यूट्यूब, सोशल मीडियावरच तासनतास आपला वेळ घालवतात. पण अशा प्रकारे अतिरिक्त लॅपटॉप, मोबाईलचा वापर करणं आपल्या डोळ्यांना थकवत आहे. केवळ थकवतच नाही, तर डोळ्यांतील पाणीही कमी करत आहे.

नेत्र तज्ञांकडे दररोज अशा प्रकारच्या अनेक केसेस येत आहे, ज्यात मोबाईल, लॅपटॉपच्या अधिक वापराने ड्राय आयची समस्या निर्माण होत आहे.

ज्या लोकांचं प्रोफेशन कम्प्युटरवर बसूनच काम करणं आहे, त्यांचा नाईलाज आहे. परंतु टीन एजर मुलांमध्ये, लहान मुलांमध्येही कम्प्युटर आणि मोबाईलच्या सवयीमुळे पापण्या उघडझाप होण्याची गती कमी होत आहे. एक मिनिटात जवळपास 12 वेळा पापण्या उघडझाप होणं गरजेचं आहे. परंतु अधिक काळ कोणतंही काम पापण्या न हलवता केल्यास, त्याचा डोळ्यांवर परिणाम होतो. डोळ्यांतील पाणी सुकू लागतं. कधी जळजळ, कधी डोळ्यात टोचल्यासारखं वाटत राहतं. रुग्णालयात अनेक लोक अशा प्रकारच्या समस्या घेऊन येत असतात.

(वाचा - तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत हे 5 सरकारी Apps, हे आहेत फायदे)

ड्राय आय -

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ओपीडीमध्ये दररोज डोळ्यांचे 200 रुग्ण येतात. त्यापैकी 50 ते 70 रुग्णांना ड्राय आय, टोचणं, डोळ्यांना जडपणा येणं अशा समस्या असतात. दररोज जवळपास 150 लोकांच्या डोळ्यांची पूर्ण तपासणी होते, यात 20 ते 25 टक्के लोकांना ड्राय आयसारखी समस्या असल्याचं तपासात समजतं.

जवळपास 10 असे रुग्ण असतात, ज्यांना लॅपटॉप किंवा मोबाईलवर अधिक वेळ घालवण्यामुळे डोळ्यातील पाणी सुकल्याची समस्या किंवा इतर डोळ्यांचे रोग झाल्याचं समोर येतं.

(वाचा - Private Sector मध्ये Jobs च्या शोधात आहात? या सरकारी पोर्टलवर मिळेल माहिती)

लक्षणं -

थकवा - जर एखाद्या व्यक्तीच्या पापण्यांची अधिक काळापर्यंत उघडझाप होत नसेल, अशावेळी डोळे थकलेले असतात. हेच दररोजच्या जीवनाचा भाग असेल, तर डोळ्यातील पाणी सुकल्याची समस्या निर्माण होते. पूर्ण दिवस थकवा जाणवतो. कोणतंही काम एकाग्रतेने होत नाही.

थायरॉईड, मधुमेह - मोबाईल आणि लॅपटॉपशिवाय मधुमेह आणि थायरॉईडमुळेही डोळ्यांचे आजार होऊ शकतात. डोळ्यांच्या पडद्याला नुकसान होऊ शकतं.

(वाचा - माणसाच्या डोक्यात चाललंय काय? Mind Reading Helmet सांगणार, किती आहे किंमत पाहा)

या गोष्टी लक्षात ठेवाच -

- एखाद्याचं प्रोफेशन कम्प्युटर, लॅपटॉपवर काम करण्याचं आहे, तर त्यांनी दर अर्धा तासाने डोळ्यांना आराम द्यावा.

- खाण्यात व्हिटॅमिन बी युक्त भाज्यांचा समावेश करावा.

- 8 तासांहून कमी झोप घेऊ नये.

- वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी आवश्यक करावी.

मोबाईलचा वापर फोनवर बोलण्यासाठी करावा. छोट्या स्क्रिनवर व्हिडीओ पाहिल्याने डोळ्यांच्या मांसपेशींवर जोर पडतो त्यामुळे डोळे जड होतात. ड्राय आय समस्या निर्माण होते.

First published:
top videos

    Tags: Eyes damage, Smartphone, Tech news