mParivahan - mParivahan अॅप रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून लाँच करण्यात आलं आहे. याद्वारे तुम्ही सहजपणे तुमच्या जवळच्या RTO ऑफिस आणि प्रदूषण चाचणी केंद्र कुठे आहे याबाबत माहिती घेऊ शकता. या अॅपद्वारे तुम्ही Moke Driving License Test ही देऊ शकता. तसंच, सेकंड हँड व्हिकल खरेदी करतानाही हे अॅप कार-बाईक रजिस्ट्रेशनसंबंधी सर्व डिटेल्सही देण्यास मदत करेल.
BHIM UPI - BHIM UPI अॅप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेलं आहे, जे यूपीआय बेस्ड आहे. या अॅपच्या मदतीने कोणालाही पैसे पाठवू शकता. याशिवाय तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे सहजपणे ट्रान्सफर करू शकता. भारतात आतापर्यंत कोट्यवधी लोक या अॅपशी जोडले असून याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
DigiLocker -इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने DigiLocker अॅप तयार केलं आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्र आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, बाईक इन्शोरन्स, आरसी अशी कागदपत्र ऑनलाईन क्लाउडवर अपलोड करू शकता. यात तुम्ही 1 जीबीपर्यंत आपल्या लीगल डॉक्युमेंट्सची स्कॅन कॉपीदेखील अपलोड करू शकता. यामुळे कागदपत्र सोबत घेऊन फिरण्याची गरज लागणार नाही. जर एखाद्या अधिकाऱ्याने किंवा पोलिसांनी आधार कार्ड मागितल्यास, त्यांना ही सॉफ्टकॉपी दाखवता येऊ शकते. हे पूर्णपणे मान्य आहे.