Home /News /lifestyle /

माणसाच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय? Mind Reading Helmet सांगणार, किती आहे किंमत पाहा

माणसाच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय? Mind Reading Helmet सांगणार, किती आहे किंमत पाहा

मानवी मेंदूची माहिती देण्यासाठी एक खास हेल्मेट तयार करण्यात आलं आहे.

    वॉशिंग्टन, 17 जून : महिलांच्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे कुणीच सांगू शकत नाही, असं मिश्किलपणे म्हटलं जातं. पण खरंतर फक्त महिलाच नाही तर कोणत्याच माणसाच्या डोक्यात काय चाललं आहे, हे फक्त पाहून कुणीच सांगू शकत नाही. पण आता हे शक्य होणार आहे. मानवी डोक्यात नेमकं काय चाललं आहे हे समजणार आहे. यासाठी एक खास हेल्मेट (Mind reading helmet) तयार होतं आहे.< अमेरिकेतील कर्नेल कंपनीचे संस्थापक ब्रायन जॉनसन (Bryan Johnson) असं हेल्मेट तयार करत आहे, जे मानवी मेंदूत काय चाललं आहे हे सांगू शकेल. ते अशी यंत्रणा तयार करत आहे, जी मानवी मेंदूला एका आर्टिफिशिअल इंटेलिजेनशी कनेक्ट करू शकतं. या माइंड रिंडिंग हेल्मेट असं म्हटलं आहे. हे खास हेल्मेट माणसाच्या मेंदूतील कार्याबाबत माहिती देईल. हे वाचा - आता पॉकेटमध्येच ठेवता येणार Ventilator; मोबाईल चार्जरने होईल चार्ज रिपोर्टनुसार जॉनसन यांनी फ्लो आणि फ्लक्स अशा दोन हेल्मेटवर प्रयोग केला. फ्लो हेल्मेट (Flow Helmet)  मेंदूतील रक्तातील ऑक्सिजिनिकरण तपासण्यासाठी लेझर लाइटचा वापर करतं, तर फ्लक्स न्यूरॉन्स फायरिंगच्या इलेक्ट्रिकल इम्प्ल्स रेकॉर्ड करतं. हे हेल्मेट मानवी मेंदूत काय चाललं आहे, याचा योग्य फोटो दाखवणार आहे. जॉन्सन यांची माइंड रिडिंग स्टार्टअप कंपनी कर्नेलने (Kernel) तयार करण्यात आलेली उपकरणं वैद्यकीय संशोधन मशीन्समध्ये आधीपासूनच आहेत. माइंड रिंडिंग हेल्मेटच्या रिसर्चच्या सुरुवातीला जॉनसन यांनी स्पेस एक्स (SpaceX) ते एलन मस्क (Elon Musk) यांच्याशी चर्चाही केली होती. ज्यांच्या न्यूरालिंक प्रोजेक्टचं (Neuralink Project) उद्दिष्ट मानवी मेंदूत  इलेक्ट्रोड इम्प्लांट करणं आहे. हे वाचा - Explainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का? काय आहेत तथ्यं? जाणून घ्या 2030 पर्यंत हे सेन्सर हेल्मेट तयार होण्याची आशा त्यांना आहे. याची किंमत 50,000 डॉलर म्हणजे जवळपास 37 लाख आहे, असं जॉन्सन यांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Brain, Health, Technology

    पुढील बातम्या