नवी दिल्ली, 25 जानेवारी : भाडेतत्वावर राहणाऱ्यांसाठी आधार कार्डवरील (Aadhaar Card) अॅड्रेस अपडेट (Aadhaar Card Address Update) करणं किंवा त्याचा ओळखपत्र म्हणून वापर करणं कठीण होत होतं. परंतु भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नियमांमध्ये बदल केला आहे. आता भाडेतत्वावर राहणारे देखील आपला अॅड्रेस अपडेट करू शकतील. यासाठी UIDAI ने एक नवी प्रोसेस सांगितली आहे. नव्या प्रोसेसमध्ये भाडेकरुकडे रजिस्टर्ड रेंट अॅग्रीमेंट असणं आवश्यक आहे. अॅग्रीमेंटमध्ये आधार होल्डरचं नाव असणं गरजेचं आहे. अॅड्रेस अपडेट करण्यासाठी रेंट अॅग्रीमेंट स्कॅन करुन ते पीडीएफ फॉर्मेटमध्ये सेव्ह करावं लागेल. त्यानंतर आधार वेबसाइटवर ती फाइल अपडेट करावी लागेल. विना रजिस्टर्ड अॅग्रीमेंट मान्य असणार नाही. रजिस्टर्ड अॅग्रीमेंट सर्वसामान्य रेंट अॅग्रीमेंटहून वेगळं असतं.
हे वाचा - Aadhaar Card संबंधी कोणतीही समस्या एका कॉलवर सोडवली जाईल, या क्रमांकावर करा कॉल
कसा कराल अॅड्रेस अपडेट - - सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. - होमपेजवर My Aadhaar टॅबवर क्लिक करा. - आता अॅड्रेस अपडेट रिक्वेस्ट टॅबवर क्लिक करा. - आता जे पेज ओपन होईल, त्यात आधार कार्ड नंबर टाकून लॉगइन करा. - लॉगइननंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल. - दिलेल्या रकान्यात OTP टाकून पोर्टलवर जा. - इथे रजिस्टर्ड अॅग्रीमेंट अपलोड करा. - अपलोड केल्यानंतर एक रेफ्रेंस नंबर मिळेल. - रेफ्रेंस नंबर घेऊन आधार केंद्रात जावं लागेल. इथे तुमचा अॅड्रेस देवून, तुम्हाला नवं आधार कार्ड त्या पत्त्यावर पाठवलं जाईल.
#AadhaarUpdateChecklist
— Aadhaar (@UIDAI) September 2, 2020
If you are using Rent Agreement for Address update in Aadhaar, ensure that it is in applicant's name and is a registered rent agreement. To update address of other family members, you may use Validation Letter service (https://t.co/ekVBGke95F) pic.twitter.com/glzSrPXY29
हे वाचा - बाजारात तयार केलेलं PVC Aadhaar Card अमान्य, असं करा UIDAI वरुन ऑनलाइन ऑर्डर
दरम्यान, UIDAI ने खुल्या बाजारात तयार करण्यात येणाऱ्या पीव्हीसी आधार कार्डला (PVC Aadhaar card) अमान्य घोषित केलं आहे. बाजारात तयार करण्यात येत असलेलं पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhaar Card) अमान्य असल्याची माहिती UIDAI ने ट्विट करून दिली आहे. त्यामुळे आता PVC Aadhaar Card केवळ UIDAI वरुनच ऑर्डर करता येणार आहे.

)







