Home /News /technology /

बाजारात तयार केलेलं PVC Aadhaar Card अमान्य, घरबसल्या असं करा UIDAI वरुन ऑनलाइन ऑर्डर

बाजारात तयार केलेलं PVC Aadhaar Card अमान्य, घरबसल्या असं करा UIDAI वरुन ऑनलाइन ऑर्डर

बाजारात तयार करण्यात येत असलेलं पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhaar Card) अमान्य असल्याची माहिती UIDAI ने ट्विट करून दिली आहे. त्यामुळे आता PVC Aadhaar Card केवळ UIDAI वरुनच ऑर्डर करता येणार आहे.

    नवी दिल्ली, 22 जानेवारी : UIDAI ने खुल्या बाजारात तयार करण्यात येणाऱ्या पीव्हीसी आधार कार्डला (PVC Aadhaar card) अमान्य घोषित केलं आहे. बाजारात तयार करण्यात येत असलेलं पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhaar Card) अमान्य असल्याची माहिती UIDAI ने ट्विट करून दिली आहे. त्यामुळे आता PVC Aadhaar Card केवळ UIDAI वरुनच ऑर्डर करता येणार आहे. काही दिवसांपूर्वी UIDAI ने आधार पीव्हीसी कार्ड जारी केलं होतं. एटीएम, ऑफिस आयकार्ड किंवा डेबिट कार्डच्या आकाराचं असल्याने ते खिशात किंवा पर्समध्ये सहजपणे ठेवता येतं. यामध्ये सुरक्षिततेचे अनेक फीचर्स (Aadhaar PVC card security features) असतात.

    हे वाचा - OnePlus मोबाइलचा खिशात स्फोट; तरुणाच्या मांडीला दुखापत, सांगलीत एकच खळबळ

    UIDAI वरुन कसं डाउनलोड कराल PVC Card? uidai.gov.in या वेबसाइटवरुन PVC कार्ड ऑर्डर करू शकता. त्यासाठी UIDAI वेबसाइटवर My Aadhaar वर क्लिक करा. त्यानंतर Order Aadhaar PVC Card लिंकद्वारे तुम्ही ऑर्डर करू शकता. 50 रुपये प्रति ऑर्डर फी देऊन ऑनलाइन पीव्हीसी आधार कार्ड मागवता येतं. UIDAI ने ऑर्डर करण्यासाठी कोणतीही लिमिट ठरवलेली नाही. स्पीड पोस्टद्वारे PVC Aadhaar Card मिळेल. स्कॅन बारद्वारेही ऑनलाइन PVC आधार कार्ड ऑर्डर करता येऊ शकतं.

    हे वाचा - पाकिस्तानातून चालणारी YouTube, Twitter आणि Facebook अकाउंट्स भारताने केली ब्लॉक, करायचे हे वाईट काम

    प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सरकारी कामांसाठी प्रत्येक खासगी कामासाठीही आधार कार्डची गरज असते. बाजारात सहजपणे PVC Aadhaar Card उपलब्ध आहे. परंतु आता UIDAI ने बाजारात बनवून मिळणारं PVC आधार कार्ड अमान्य ठरवलं आहे. अशा प्रकारच्या आधार कार्डमध्ये सुरक्षा फीचर्स नसतात, ते असुरक्षित असतात. त्यामुळे UIDAI ने आता खुल्या बाजारातून पीव्हीसी आधारच्या कॉपीचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही पीव्हीसी आधार कार्ड आपल्या जवळच्या दुकानातून बनवले असेल, तर ते बदला आणि नव्या आधार कार्डसाठी UIDAI मध्ये अर्ज दाखल (Aadhaar card apply) करा. UIDAI च्या म्हणण्यानुसार, uidai.gov.in वरून डाउनलोड करण्यात आलेले आधार किंवा आधार लेटर किंवा एम-आधार (M-Aadhaar) प्रोफाइल किंवा UIDAI कडून जारी करण्यात आलेले आधार पीव्हीसी कार्ड त्याद्वारेच आधार कार्ड (Aadhaar Card) शी संबंधित कामामध्ये वापर केला जाऊ शकतो.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Aadhar card, Aadhar card on phone, M aadhar card

    पुढील बातम्या