नवी दिल्ली, 22 मे : स्मार्टफोन (Smart Phone) वापरणारे अनेक लोक आपलं खासगी चॅट किंवा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या मोबाईलला पॅटर्न लॉक (Pattern Lock) किंवा पासवर्ड ठेवतात. यामुळे कोणीही व्यक्ती आपला फोन सहजपणे ओपन करू शकत नाही. पण कधीतरी पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड अनेक जण विसरतात आणि मोठी पंचाईत होते. अशावेळी सर्विस सेंटरमध्ये जाऊन हे काम करावं लागतं. यात वेळ, तर जातोच पण पैसेही खर्च होतात. पण जर कधी Mobile Phone चा पॅटर्न लॉक, पासवर्ड विसरलात तर घाबरण्याची गरज नाही. काही स्टेप्स वापरुन फोन पुन्हा अनलॉक करता येऊ शकतो.
कधीही मोबाईल फोनचं लॉक, पासवर्ड विसरलात तर घरबसल्या काही मिनिटांत फोन अनलॉक (Unlock Phone) करता येऊ शकतो. अँड्रॉईड स्मार्टफोन (Android Smart Phone) असल्यास, लॉक पॅटर्न-पासवर्ड विसरलेला फोन आधी स्विच ऑफ करा. एक मिनिटापर्यंत वाट पाहा. आता वॉल्यूमच्या खालचं बटण आणि पॉवर बटण एकत्र दाबा. त्यानंतर फोन रिकव्हरी मोडमध्ये जाईल, यात फॅक्ट्री रिसेट बटणावर क्लिक करा.
डेटा क्लिन -
डेटा क्लिन करण्यासाठी wipe Cache वर टॅप करा. पुन्हा एका मिनिटापर्यंत वाट पाहा आणि त्यानंतर अँड्रॉईड डिव्हाईस स्टार्ट करा. आता मोबाईल फोन अनलॉक होईल. यावेळी अनेक लॉग-इन आयडी आणि एक्सटर्नल मोबाईल अॅप डिलीट होतील, परंतु हे अॅप तुम्ही पुन्हा डाउनलोड करू शकता.
इंटरनेट -
ही ट्रिक वापरण्याआधी लॉक मोबाईल फोनमध्ये अॅक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे. जर डेटा कनेक्शन ऑन असेल, तर डिव्हाईस सहजपणे अनलॉक करू शकता. स्मार्टफोनमध्ये 5 वेळा चुकीचा पॅटर्न ड्रा करा. आता एक नोटिफिकेशन येईल, ज्यात 30 सेकंदांनी पुन्हा ट्राय करा असा मेसेज असेल.
जीमेल आयडी आणि पासवर्ड -
आता त्यात Forget Password चा एक पर्याय दिसेल. यात जीमेल आयडी आणि पासवर्ड टाका, जो लॉक्ड डिव्हाईसमध्ये टाकला होता. त्यानंतर फोन अनलॉक होईल. आता युजर नवा पॅटर्न लॉक सेट करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.