मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमचं Account, Password सुरक्षित कसं ठेवाल? Google ने सांगितल्या खास टिप्स

तुमचं Account, Password सुरक्षित कसं ठेवाल? Google ने सांगितल्या खास टिप्स

अधिकतर लोक पासवर्ड (Password) लक्षात राहण्यासाठी अतिशय सोप्या पासवर्डचा वापर करतात, पण लक्षात राहण्यासाठी अतिशय सोपा ठेवलेला पासवर्ड सहजपणे क्रॅकही केला जातो. त्यामुळे तुमचं अकाउंट हॅक होण्याची भीती असते.

अधिकतर लोक पासवर्ड (Password) लक्षात राहण्यासाठी अतिशय सोप्या पासवर्डचा वापर करतात, पण लक्षात राहण्यासाठी अतिशय सोपा ठेवलेला पासवर्ड सहजपणे क्रॅकही केला जातो. त्यामुळे तुमचं अकाउंट हॅक होण्याची भीती असते.

कोणत्याही ऑनलाईन अकाउंटच्या सेफ्टीमध्ये पासवर्डची (Password) मोठी भूमिका असते. याबाबत गुगलनेच (Google) काही खास टिप्स सांगितल्या आहेत, ज्याद्वारे अकाउंट सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं.

नवी दिल्ली, 22 मे : कोरोना काळात अनेक जण ऑनलाईन काम करत आहेत. अशात प्रत्येकाच्या ऑनलाईन अकाउंटची (Online Account) सेफ्टी अतिशय महत्त्वाची आहे. कोणत्याही ऑनलाईन अकाउंटच्या सेफ्टीमध्ये पासवर्डची (Password) मोठी भूमिका असते. याबाबत गुगलनेच (Google) काही खास टिप्स सांगितल्या आहेत, ज्याद्वारे अकाउंट सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं. यामुळे युजर्सचे ऑनलाईन फायनेंशियल अकाउंट्सही सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

गुगलने आपल्या टिप्समध्ये सांगितलं, की कोणत्याही युजरचा असा प्रयत्न असावा, की प्रत्येक अकाउंटचा पासवर्ड वेगळा असेल. काही विशेष अकाउंट इंटरनेट बँकिंग सारख्या गोष्टींचे तर पासवर्ड, वेगळेच असावेत.

पासवर्ड मोठा असणं गरजेचं आहे. कमीत-कमी आठ कॅरेक्टर पासवर्डमध्ये असावेत. पासवर्डमध्ये वेगवेगळ्या अक्षरांचं कॉम्बिनेशन असणं आवश्यक आहे. यामुळे पासवर्ड स्ट्राँग होतो.

(वाचा - तुम्हीही हा पासवर्ड ठेवलाय का? अकाउंट हॅक होण्याची शक्यता; पाहा या वर्षातील सर्वात बिनकामाचे 20 पासवर्ड)

कोणत्याही सोशल मीडिया साईट्स, जीमेल किंवा बँकिंग संबंधी गोष्टींचा पासवर्ड ठेवताना त्यात कोणतीही पर्सनल माहिती असू नये. नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर खासगी गोष्टी पासवर्ड म्हणून ठेऊ नयेत.

तसंच, अकाउंटमध्ये मल्टी लेवल ऑथेंटिकेशन इनेबल्ड असावं. यामुळे पासवर्डची सुरक्षा आणखी मजबूत होण्यास मदत होते. त्याशिवाय युजरने आपला कम्प्यूटर, सॉफ्टवेअर इतर गोष्टी अपडेटेड ठेवाव्यात.

ऑनलाईन अकाउंटमध्ये रिकव्हरी फोन नंबर किंवा ईमेल अॅड्रेस सेट करा. जर तुमच्या अकाउंटचा कोणी विना परवानगी वापर करत असल्याची शंका असल्यास किंवा एखाद्याला ब्लॉक करायचं असल्यास रिकव्हरी कामी येऊ शकतं. तसंच तुमच्या अकाउंटचा अॅक्सेस गेल्यास, रिकव्हरीमुळे सहजपणे साईन-इन करता येतं.

पासवर्डबाबत तज्ज्ञांचं काय आहे मत

आपण कोणताही पासवर्ड सेट करताना लक्षात राहिल हा एकच विचार करुन अगदी सोपा पासवर्ड ठेवतो. उदा. 12345, 00000 अशा पद्धतीचे पासवर्ड ठेवताना आपण हा विचार नाही करत की हॅकर्सचं काम आपण अगदी सोप करत आहोत. आपलं अकाऊंट अशा सोप्या पासवर्डमुळे हॅक होऊ शकतं. सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक जण घरातील सदस्य, बॉयफ्रेन्ड किंवा अगदी सोपी नावं टाकतात. जन्मतारीख आणि नाव या दोन्ही गोष्टी हॅक करणं अगदी सहज शक्य असल्यानं त्या पासवर्ड म्हणून ठेवू नयेत. याचा अंदाज हॅकर्स अगदी सहज लावू शकतो आणि तुमचं अकाऊंट हॅक होऊ शकतं.  पासवर्डमध्ये एक कॅपिटल, अंक, कोडवर्ड, अक्षरांचा समावेश असेल तर तो क्रॅक करणं तुलनेनं कठीण होऊ शकतं असं तज्ज्ञ सांगतात.

First published:
top videos