Home /News /technology /

WhatsApp वर या Scam पासून राहा सावधान; Account हॅक झाल्यास काय कराल?

WhatsApp वर या Scam पासून राहा सावधान; Account हॅक झाल्यास काय कराल?

व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या एक नवा स्कॅम होत असल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर लोकांना OTP पाठवून फसवणूक केली जात आहे.

  नवी दिल्ली, 22 मे : कोरोना काळात (Coronavirus) डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली असली, तरी याच काळात सायबर क्राईमच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. नव्या-नव्या गोष्टींसह सायबर क्रिमिनल्स सोशल मीडियावर लोकांची फसवणूक करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या एक नवा स्कॅम होत असल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर लोकांना OTP पाठवून फसवणूक केली जात आहे. फसवणूक करणारे तुमच्याच कॉन्टॅक्टमधील एखाद्याच्या नंबरचा वापर करुन, मदतीसाठी मेसेज करतात आणि त्यातूनच फसवणूक केली जाते. युजर्सनी अशा स्कॅमपासून सावध राहण्याची गरज आहे. WhatsApp युजरला सायबर क्रिमिनल, युजरच्याच कॉन्टॅक्टमधील एखाद्याच्या नावाने आपण अडचणीत असून मदतीची गरज असल्याचा मेसेज करतात. आपल्याच कॉन्टॅक्टमधील ओळखीच्या व्यक्तीने मेसेज केल्याचं त्या युजरला वाटू शकतं. त्यानंतर फ्रॉडस्टर्सकडून युजरला OTP पाठवला जातो आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अकाउंट हॅक केलं जातं. हे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक झाल्यानंतर हॅकर्स आपल्या हिशोबाने त्याचा वापर करतात. ज्याचं अकाउंट हॅक केलं आहे, त्याच्या नावाने त्याच्या कॉन्टॅक्टमधील इतरांनाही पुढे टार्गेट केलं जातं. व्हॉट्सअ‍ॅपचा चुकीचा वापरही याद्वारे केला जाऊ शकतो.

  (वाचा - तुमचं Account, Password सुरक्षित कसं ठेवाल? Google ने सांगितल्या खास टिप्स)

  अकाउंट हॅक झाल्यास काय कराल? व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट (WhatsApp Account) हॅक झाल्यानंतर त्वरित WhatsApp रिसेट करा. अशा स्थितीत नव्याने WhatsApp Login करावं लागेल. त्यानंतर नंबरवर OTP येईल आणि सायबर क्रिमिनलकडून (Cyber Criminal) अकाउंट Log Out होईल. हा उपाय वेळीच, त्वरित करणं गरजेचं आहे. युजर्सनी मागितल्याशिवाय ओटीपी येत नाही. WhatsApp कधीही परवानगीशिवाय OTP पाठवत नाही. अशात जर कोणीही ओटीपी पाठवला तर सावध व्हा.

  (वाचा - Whatsapp चॅट्स ठेवा सुरक्षित; असं लॉक करा तुमचं अकाउंट)

  सायबर क्रिमिनल्स तुमच्या जवळचे नातेवाईक बनूनच फसवणूक करतात. त्यामुळे ज्याच्या नावाने मदत मागितली जात आहे, त्याला लगेच कॉल करुन याबाबत चौकशी करा. कधीही कोणाशीही ओटीपी शेअर करू नका. तसंच WhatsApp मध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-Factor Authentication) ऑप्शनही On ठेवा. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्यास, किंवा दुसऱ्या डिव्हाईसमध्ये सुरू करण्यासाठी OTP शिवाय आणखी एका कोडची गरज लागेल. त्यामुळे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन फायद्याचं ठरतं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Hacking, Otp, Tech news, Whatsapp News

  पुढील बातम्या