मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या Android Smartphone चा Lock Password विसरलात? असा करा Unlock

तुमच्या Android Smartphone चा Lock Password विसरलात? असा करा Unlock

 Smartphone चा लॉक पासवर्ड अनेकदा विसरला जातो. अशावेळी पासवर्ड लक्षात नसल्याने समस्या येऊ शकतात. परंतु एका ट्रिकने हे कामं सोपं होऊ शकतं.

Smartphone चा लॉक पासवर्ड अनेकदा विसरला जातो. अशावेळी पासवर्ड लक्षात नसल्याने समस्या येऊ शकतात. परंतु एका ट्रिकने हे कामं सोपं होऊ शकतं.

Smartphone चा लॉक पासवर्ड अनेकदा विसरला जातो. अशावेळी पासवर्ड लक्षात नसल्याने समस्या येऊ शकतात. परंतु एका ट्रिकने हे कामं सोपं होऊ शकतं.

नवी दिल्ली, 10 जानेवारी : Smartphone सर्वांसाठी महत्त्वाचा ठरत असून त्याची सुरक्षाही महत्त्वाची असते. अनेकजण पासवर्ड, पीन नंबरने स्मार्टफोन प्रोटेक्ट ठेवतात, जेणेकरुन लहान मुलं किंवा चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेल्यास फोनचा चुकीचा वापर होऊ नये. आता फेस अनलॉक, फिंगरप्रिंटसारख्या अॅडव्हान्स ऑप्शनमुळे पासवर्ड, पीन नंबर ठेवून त्याचा वापर होत नसल्याने अनेकदा तो विसरला जातो. अशावेळी पासवर्ड लक्षात नसल्याने समस्या येऊ शकतात. परंतु एका ट्रिकने हे कामं सोपं होऊ शकतं.

DroidKit App -

स्मार्टफोनचा लॉक पासवर्ड विसरल्यास, फोन अनलॉक होत नसल्यास ड्रोइडकिट (DroidKit App) चांगला पर्याय आहे. याच्या मदतीने लॉक स्मार्टफोन पासवर्ड किंवा पीन लक्षात नसल्यासही अनलॉक करता येतो. या App द्वारे कोणताही पीन पासवर्ड, फेस अनलॉक, फिंगरप्रिंटसारखे पासवर्ड अनलॉक करण्यास मदत होते.

हे वाचा - End-to-end encrypted असूनही WhatsApp Chat का लीक होतात? ही आहेत कारणं

DroidKit App सह कसा अनलॉक कराल फोन?

- तुमच्या मॅकबुक किंवा विंडोज PC वर हे App डाउनलोड करा.

- त्यानंतर ड्रोइडकिट लाँच करुन अनलॉक स्क्रिनवर टॅप करा.

- स्मार्टफोन या App शी कनेक्ट करण्यासाठी USB केबलची गरज लागेल. एकदा कनेक्ट केल्यानंतर स्टार्ट बटणावर क्लिक करा.

- त्यानंतर प्रेपेयरिंग डिवाइस कॉन्फिगरेशनचा एक टॅब प्रोग्रेस बारसह ओपन होईल, जो तुमच्या कॉन्फिगरेशन प्रोसेसचं स्टेटस शो करेल.

- कॉन्फिगरेशन स्टेटस पूर्ण झाल्यानंतर नोटिफिकेशन येईल. त्यानंतर Remove Now वर क्लिक करा.

- आता अँड्रॉईड स्मार्टफोन ब्रँड सिलेक्ट करा आणि त्यानंतर Next वर क्लिक करा.

- त्यानंतर फोन रिकव्हरी मोडमध्ये ठेवावा लागेल आणि फोनमधील cache डिलीट करावा लागेल. त्यानंतर स्मार्टफोनमध्ये येणारे इन्स्ट्रक्शन फॉलो करावे लागतील.

- एकदा प्रोग्रेस बार पूर्ण झाल्यानंतर स्क्रिनवर रिमूव्ह स्क्रिन लॉक पर्याय येईल. त्यानंतर तुम्ही तुमचा फोन अनलॉक करुन वापरू शकता.

First published:

Tags: Android, Password, Smartphone, Tech news