हॅकर्सपासून तुमचा Android Smartphone असा ठेवा सुरक्षित, आजच करा हे 5 बदल

हॅकर्सपासून तुमचा Android Smartphone असा ठेवा सुरक्षित, आजच करा हे 5 बदल

अँड्रॉईड युजर्स आपल्या फोनमध्ये काही बदल करुन आपला पर्सनल आणि फायनेंशियल डेटा सुरक्षित ठेऊ शकतात. अँड्रॉईड फोनमध्ये चांगल्या सुरक्षेसाठी काही बदल करणं फायद्याचं ठरेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून : अँड्रॉईड स्मार्टफोनचा (Android Smartphone) वापर संपूर्ण जगभरात सर्वाधित केला जातो. त्यामुळे स्कॅमर्स, हॅकर्स (Hackers) आणि व्हायरसचा सर्वाधिक धोकाही अँड्रॉईड युजर्सला असतो. गुगलने (Google) अँड्रॉईडला अधिक सुरक्षा देण्यासाठी वेळोवेळी आपल्या प्रायव्हसी अँड प्रोटेक्शन सेटिंगमध्ये अपडेट केलं आहे. अँड्रॉईड युजर्स आपल्या फोनमध्ये काही बदल करुन आपला पर्सनल आणि फायनेंशियल डेटा सुरक्षित ठेऊ शकतात. अँड्रॉईड फोनमध्ये चांगल्या सुरक्षेसाठी काही बदल करणं फायद्याचं ठरेल.

Apps -

वेळोवेळी आपल्या स्मार्टफोनमधील Apps चेक करणं अतिशय गरजेचं आहे. अनेकदा APK अ‍ॅप फोनमध्ये डाउनलोड होत असतात, याबाबत युजरला माहितीही नसते. अनेकदा spyware, malware आणि adware फोनच्या बॅकग्राउंडमध्ये काम करत असतात, जे फोनचा डेटा चोरी करू शकतात. हे स्मार्टफोनच्या होम स्क्रिनवर दिसत नाहीत, मात्र यामुळे फोनला धोका निर्माण होऊ शकतो.

परमिशन मॅनेजर -

सेटिंग्समध्ये परमिशन मॅनेजरमध्ये सर्व अ‍ॅप चेक करणं आवश्यक आहे. सर्व अ‍ॅप इन्स्टॉलवेळी तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा, कॉल, मायक्रोफोन, सेंसर, कॉन्टेक्ट, फोन आणि फाईल्स आणि मीडियाची परमिशन घेतात. महत्त्वाची बाब म्हणजे सर्व अ‍ॅप्सचा वापर करताना, या सर्व परमिशन्सची आवश्यकता नसते. युजर्स या अ‍ॅप सेटिंगमध्ये ask every time किंवा deny पर्याय निवडू शकतात.

(वाचा - WhatsApp मध्ये End-to-end encryption नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या हे कसं काम करतं)

गुगल प्ले स्टोर -

कोणत्याही लिंकवर क्लिक करुन अ‍ॅप डाउनलोड करू नका. अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी केवळ Google Play Store चा वापर करा. तुमच्या फोनच्या सिक्योरिटी सेटिंगमध्ये गुगल प्ले प्रोटेक्ट ऑन करा आणि वेळोवेळी स्कॅन करा.

अनोळखी अ‍ॅप -

फोन सेटिंगमध्ये Unknown Source किंवा थर्ड पार्ट अ‍ॅपला बंद करा. हे बंद केल्यामुळे कोणतंही अनोळखी अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये, तुमच्या परवानगीशिवाय डाउनलोड होणार नाहीत.

(वाचा - Alert! पब्लिक WiFi चा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवाच)

अ‍ॅप पिनिंग ऑन ठेवा -

जर तुम्ही तुमचा फोन तुमच्या मित्राला गेम खेळण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी देत असाल, तर फोन देण्याआधी अ‍ॅप पिनिंग ऑन करा. हे फीचर ऑन केल्यामुळे कोणीही तुमच्या फोनमध्ये इतर गोष्टी पाहू शकत नाहीत.

त्याशिवाय, तुमच्या फोनमध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ठेवा आणि नोटिफिकेशन लॉक स्क्रिनवर दिसू नये अशी सेटिंग करा. ज्यावेळी गरज नसेल, तेव्हा फोनचं ब्लूटूथ, WiFi, लोकेशन बंद ठेवा. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, तसंच कोणालाही तुमची OTP सारखी खासगी माहिती शेअर करू नका. या काही सोप्या गोष्टी फॉलो करुन तुम्ही तुमच्या फोनचा व्हायरस, हॅकर्सपासून बचाव करू शकता.

Published by: Karishma Bhurke
First published: June 11, 2021, 3:59 PM IST

ताज्या बातम्या