नवी दिल्ली, 30 जून : मोबाईल फोन (Mobile Phone) हरवला किंवा खराब झाल्यास, त्यातील कॉन्टॅक्ट नंबर (Contact Numbers) परत कसे मिळवायचे हा सर्वात मोठा प्रश्न असतो. अनेक वर्षांपासूनचे इतके नंबर्स पुन्हा एकत्र करणं कठीण काम ठरतं. तसंच काही नंबर्स असे असतात, जे परत मिळवणंही सोपं नसतं. परंतु अशावेळी सोप्या पद्धतीने फोन नंबर्स रिस्टोर (Restore) करता येतात. Gmail Account - कॉन्टॅक्ट नंबर्स रिकव्हर करण्यासाठी सर्वात आधी युजरचं जीमेल अकाउंट (Gmail Account) असणं अतिशय गरजेचं आहे. जर तुमच्याकडे जीमेल अकाउंट नसेल, तर सर्वात आधी जीमेल अकाउंट बनवावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये, Gmail अकाउंटमध्ये लॉगइन करावं लागेल.
(वाचा - Google हिस्ट्री डिलीट केल्यानंतरही समजेल कोणी काय सर्च केलं होतं, अशी आहे प्रोसेस )
Gmail Contact - Gmail अकाउंट सतत सिंक करत राहवं लागेल. यामुळे जो कोणताही नंबर तुम्ही फोनमध्ये सेव्ह कराल, तो रियल टाईममध्ये अपडेट होत राहील. फोन सेटिंगमध्ये जा. त्यानंतर Contact Backup ऑन करा. Settings मध्ये Account and Sync ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुमचं जीमेल अकाउंट अॅक्टिव्हेट करा. त्यानंतर तुमच्या फोनमधील सर्व नंबर आपोआप जीमेलवर बॅकअप होत जातील.
(वाचा - OK Google बोलल्यानंतर कंपनीचे कर्मचारी ऐकतात तुमचं बोलणं, गुगलचा मोठा खुलासा )
कॉन्टॅक्ट लिस्ट - कॉन्टॅक्ट लिस्ट पाहण्यासाठी गुगलच्या होम पेजवर उजव्या बाजूला असलेल्या Gmail जवळील Contacts ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर स्क्रीनवर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर दिसतील. या सर्व नंबर्सचा बॅकअपही घेता येऊ शकतो. इथे कॉन्टॅक्ट नंबर डिलीट करण्याचाही ऑप्शन दिला जाईल.